Home /News /crime /

संशयामुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या

संशयामुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येपूर्वी महिलेने फॅमिली ग्रुपवर मेसेज शेअर केला. त्यानंतर काही तासात गळफास घेत महिलेने आत्महत्या केली.

    भोपाळ, 19 जानेवारी : मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं वृत्त समोर आलं आहे. डॉक्टर पतीच्या बेफिकीरीमुळे संतापून महिलेने हे पाऊल उचललं. फाशी घेण्यापूर्वी तिने फॅमिली ग्रुपमध्ये मेसेज पाठवला की, 7 वर्षांपासून सहन करतेय. आता आणखी सहन होत नाही. डॉ. किर्तीचे वडील एमके जैन, पशुपालन विभागाचे ACS कंसोटियााचे पीए आहेत. मृत महिलेचा पती डॉ. स्वप्नील जैनवर संशय होता. कुटुंबीयांनी डॉ. स्वप्निलवर किर्तीला त्रास देण्याचा आरोप केला आहे. 5 दिवसांपूर्वी आईला फोनवरुन केली होती तक्रार.. पती रुग्णालयातून उशिरा घरी येतो. मी आजारी असले तरी माझ्याकडे लक्ष देत नसल्याचं तिने आईला सांगितलं होतं. माझ्याकडे आणि मुलांकडे अजिबात लक्ष देत नाही. क्लिनिकमध्ये तीन CCTV लावले आहेत, ज्यातील एक बंद आहे. एकाचं मेमरी कार्ड काढून टाकलं आहे. पाच दिवसांचं फुटेजदेखील डिलीट केलं आहे. हे सर्व का आहे? कोणाची भीती आहे? माझ्यापासून काय लपवलं जात आहे? आता खूप झालं. सात वर्षे झाली मी हे सर्व सहन करीत आहे. आता सहन नाही होत. तुम्ही मला भोपाळला ट्रान्सफर करून द्या, मी तेथेत नोकरी करेन. डॉक्टर दाम्पत्यांमध्ये 5 वर्षांपासून सुरू होता वाद... जबलपूरच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. स्वप्निल जैन मूलत: कटंगीचे राहणारे आहेत. 2015 मध्ये त्यांचं लग्न भोपाळ निवासी होमियापॅथी डॉक्टर किर्ती जैन (32)सोबत झालं. त्यांना वंश (6) आणि वंशिका (18 महिने) असे दोन मुलं आहेत. यापूर्वी स्वप्निल जबलपूर रुग्णालयात काम करीत होता. सध्या त्याने स्वत:चं रुग्णालय सुरु केलं आहे. गेल्या पाच वर्षांपासून डॉक्टर दाम्पत्यांमध्ये वाद सुरू होता. हे ही वाचा-वाचवा! धगधगत्या बसच्या खिडकीतून महिलेची मदतीसाठी मागणी; सर्वांसमोर जिवंत जळाली! पतीवर लक्ष ठेवण्यासाठी घरात आणि रुग्णालयात लावले सीसीटीव्ही दुसरीकडे, पती स्वप्निलसह कुटुंबीयांचा दावा आहे की, कीर्ती आपल्या पतीवर संशय घेत होती. स्वप्निलचे इतर मुलींसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय तिला होता. त्यामुळे त्यांनी घरापासून हॉस्पिटलपर्यंत सीसीटीव्ही लावले होते. ती अनेकदा रेकॉर्डिंग तपासण्यासाठी जात असे. तीन-चार दिवसांपूर्वी ती रेकॉर्डिंग तपासण्यासाठी पोहोचली, तेव्हा पाच दिवसांचे रेकॉर्डिंग डिलीट झाल्याचे आढळून आले. यावरून दोघांमध्ये वादही झाला होता. ज्याबद्दल किर्तीने तिच्या आईलाही सांगितले होते. सुसाइडच्या काही वेळापूर्वी फॅमिली ग्रुपवर शेअर केला मेसेज किर्तीने सोमवारी रात्री साधारण 10.45 मिनिटांनी गळफास घेतला. याआधी 8 वाजता तिने कुटुंबीयांच्या सोशल मीडियावर ग्रुपवर मेसेज पोस्ट केला. यात लिहिलं होतं की, तुम्हाला विनंती आहे. बाबांना सांगून मला भोपाळला ट्रान्सफर करा. आता अजून सहन होत नाही. मृत महिलेच्या वडिलांनी आरोप केला आहे की, लग्नाच्या वर्षापासूवच डॉ. स्वप्निल किर्तीला त्रास देत होता. तिने अनेकदा घरी याबाबत तक्रार केली होती. एकदा तर हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचले होतं. स्वप्निलने किर्तीसोबत चांगली वागणूक करणार असल्याचं लिहूनही दिलं होतं. त्यानंतरच तिला घरी पाठवल्याचं महिलेच्या वडिलांनी सांगितलं.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Madhya pradesh, Suicide

    पुढील बातम्या