नवी दिल्ली 02 ऑक्टोबर : 96 वर्ष वय होईपर्यंत जगणं हीच फार मोठी गोष्ट आहे. यातही इतकं वय होऊनही जर एखादा व्यक्ती चालू-फिरू शकत असेल तर ही बाब आणखीच विशेष. मात्र, उत्तर जर्मनीमधील (North Germany) 96 वर्षीय एका महिलेनं (Woman) असं काम केलं आहे, ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण आहे.
ही महिला नाझींच्या (Nazi) ताब्यात असलेल्या पोलंडमध्ये (Poland) एसएस कमांडर सेक्रेटरी राहिली आहे आणि तिच्यावर 11 हजार लोकांच्या हत्येत (Murder) मदत केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात न्यायालयात (Court) महिलेविरोधात खटलाही सुरू आहे, परंतु या काळात तिने आणखी एक कांड केला आहे.
मैत्रिणीच्या मुलीला बर्थडेला नेलं अन्..; चिमुकलीच्या कौमार्याचा 40 हजारांत सौदा
सुरुवातीला इरमगार्ड फुरचनर नावाच्या या महिलेने बराच काळ खटल्यासाठी न्यायालयात येणे टाळले. यासाठी तिच्या वकिलांनी महिलेच्या वयाचं कारण दिलं. यानंतर न्यायालयाने महिलेविरोधात अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केलं. पण कोर्टात येण्याऐवजी ती महिला टॅक्सी पकडून पळून गेली.
96 वर्ष वय असतानाही कोर्ट आणि पोलिसांना चकमा देत पळ काढण्याची हिंमत करणारी ही महिला काहीच वेळात पकडली गेली. यानंतर, जेरुसलेममधील सायमन विसेन्थल सेंटरच्या कार्यालयात नाझी-हंटर प्रमुख इफ्राईम जुरोफ म्हणाले की, 'जर ती पळून जाण्यासाठी सक्षम असेल तर ती तुरुंगात राहण्यासाठीही फीट आहे.'
मुंबईतील महिलेवर आध्यात्मिक बाबाकडून विकृत कृत्य; नराधमाला गुजरातमधून अटक
1939 ते 1945 या दुसऱ्या महायुद्धादरम्यान (Second World War) नाझी छावणीत हजारो लोक मारले गेले. त्या काळात इर्मगार्ड 18 वर्षांची होती आणि अशाच एका कॅम्पची सचिव होती. त्यामुळे तिच्यावर बाल न्यायालयात खटला चालवावा लागला. मेट्रो यूकेच्या अहवालानुसार, बचाव पक्षाच्या वकिलांनी म्हटलं की, हा खटला या गोष्टीवर केंद्रीत असेल की 96 वर्षीय महिलेला त्यावेळी झालेल्या अत्यातारांची माहिती होती की नाही .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder news