जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Shocking! 10 अल्पवयीन जोडप्यांचं धुमधडाक्यात बाल विवाह, फोटोग्राफी अन् रिसेप्शनदेखील..

Shocking! 10 अल्पवयीन जोडप्यांचं धुमधडाक्यात बाल विवाह, फोटोग्राफी अन् रिसेप्शनदेखील..

Shocking! 10 अल्पवयीन जोडप्यांचं धुमधडाक्यात बाल विवाह, फोटोग्राफी अन् रिसेप्शनदेखील..

अद्यापही देशात बाल-विवाहासारख्या कुप्रथा केल्या जातात, असं कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. मात्र राजस्थानमधून (Rajasthan News) ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जयपूर, 22 एप्रिल : अद्यापही देशात बाल-विवाहासारख्या कुप्रथा केल्या जातात, असं कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. मात्र राजस्थानमधून (Rajasthan News) ही धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारकडून बाल विवाह (Child marriage) रोखण्यासाठी तयार केलेला कायदा आणि जागरूकता अभियानानंतर येथील 16 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बाल-विवाहाच्या घटना घडत आहेत. यात भीलवाडा जिल्हा टॉपवर आहे.

जाहिरात

येथे 2 दिवसांपूर्वी 10 अल्पवयीन मुलांचा विवाह धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. तीन दिवसांपर्यंतच्य सोहळ्यातील सर्व विधी करण्यात आल्या. अल्पवयीन नवरा-नवरीने हजारो लोकांच्या उपस्थितीत स्टेजवर वरमाला घातली आणि त्यांचा फोटो शूटही केला. मात्र पोलिसांना याची माहितीही नव्हती.

हे ही वाचा- स्वातंत्र्यानंतरही देशात दलित तरुणाला भयावह वागणूक; गावातील 11 जणांवर कडक कारवाई

हे प्रकरण भीलवाडामधील मांडल भागातील आहे. येथे बुधवारी रात्री विविध 10 अल्पवयीन जोडप्याचं लग्न झालं. मिळालेल्या माहितीनुसार, लांगरो गावात विविध ठिकाणी तब्बल 17 वराती आल्या होत्या. यात अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. बाल-विवाहात हजारो लोकांसाठी रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. एक एनजीओ कार्यकर्त्याने बाल विवाहाची सूचना पोलिसांना दिली होती, असाही आरोप करण्यात आला आहे.

वरात गेल्यानंतर एफआयआर दाखल.. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. सोबतच या लग्नात गुरूजी, फोटोग्राफर आणि अन्य काम करणाऱ्यांची यादी मागवण्यात आली आहे. गुरुवारी बाल विवाहाची तक्रार मिळाल्यानंतर बाल कल्याण समिती आणि चाइल्ड लाइनच्या सदस्यांची टीम गावात पोहोचली होती. युनिसेफच्या गेल्या अनेक आकड्यांनुसार, भारत सर्वाधिक बाल विवाह राजस्थान, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये होतात. विशेष करून राजस्थानमधील 16 जिल्हे सर्वाधिक बदनाम आहेत. या जिल्ह्यात दौसा, जोधपुर, भीलवाड़ा, चूरू, झालावाड़, टोंक, उदयपुर, करौली, अजमेर, बूंदी, चितौडगढ़, मेड़ता-नागौर, पाली, सवाईमाधोपुर, अलवर व बारां यांचा समावेश आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात