दमोह, 21 एप्रिल : समाजात अस्पृश्यता नाहीशी झाली असे कितीही दावे केले तरी अद्यापही ग्रामीण भागातून अशा अनेक धक्कादायक घटना समोर येतात. असाच एक प्रकार 20 एप्रिल रोजी सगोरिया (Madhya Pradesh News) गावात पाहायला मिळाला. येथे एका दलित तरुणाला (Dalit Groom) काही आरोपींनी त्रास दिल्याचं समोर आलं. गावातील काही आरोपींनी दलित तरुणाला घोडीवर बसण्यास नकार दिला. या घटनेबद्दल माहिती समोर येताच, भागातील राज्य अनुसूचित आयोगाचे सदस्य राज्य मंत्री दर्जा मिळालेले प्रदीप आहिरवारला मोठ्या पोलीस दलासह प्रशासकीय अधिकाऱ्यांसह गावात जावं लागलं.
यानंतर तरुण नीरज अहिरवारला घोडीवर बसण्यास नकार देणाऱ्या 11 जणांना पोलिसांनी अटक केली. यानंतर पोलिसांच्या सुरक्षेसह तरुणाला घोडीवर बसून गावात वरात काढण्यात आली. यापूर्वीच संबंधिक 11 जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी या प्रकरणात सांगितलं की, दलित मुलाची वरात काढण्यापूर्वी डब्बू लोधी, धन सिंह लोधी, गोविंद लोधी यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं.
हे ही वाचा-प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाल्याने गायिकेला मोठा मनस्ताप, शेअर न करण्याची केली विनंती
लग्नासाठी घोडीवर बसवून वरात काढण्यासाठी अनुसूचित आयोगाचे सदस्य प्रदीप अहिरवार यांनी सांगितलं की, नीरजने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्याने लिहिलं होतं की, 20 एप्रिल रोजी त्याचं लग्न आहे. आणि गावातील काही आरोपींनी त्याला घोडीवर बसण्यास नकार दिला होता. गावात दलित समाजातील तरुणाला घोडीवर बसण्यास मज्जाव करण्यात येतो. यावर लक्ष देत वरात पूर्वी नवरदेव नीरजला घोडीवर बसवून मिरवणुकीचा विधी पूर्ण केला. ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरही अद्याप दमोह जिल्ह्यात अशा प्रकारची कुप्रथा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Dalit, Madhya pradesh