नवी मुंबई 08 ऑक्टोबर : चोरी आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकदा चोर गर्दीच्या ठिकाणीही अगदी सहज मौल्यवान वस्तू हिसकावून नेताना दिसतात. नवी मुंबईतून एका अशाच घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. नवी मुंबईच्या बेलापूर येथील एका सोसायटीच्या गेटमध्ये असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी एका चोरट्याने ओढून नेली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. VIDEO - शेजारी गेलेला मुलगा घरी परतलाच नाही; बिल्डिंगच्या लिफ्टचं CCTV फुटेज पाहून सर्व हादरले या घटनेत दुचाकीस्वार या महिलेचा पाठलाग करत आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं, की महिला एका लहान मुलाला घेऊन चाललेली आहे. ती रस्त्यावरुन सोसायटीच्या गेटमध्ये येते. इतक्यात एक व्यक्ती अगदी जोरात धावत महिलेजवळ येतो. महिलेला काही कळण्याच्या आत तो तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचून तिथून पळून जातो.
नवी मुंबईच्या बेलापूर येथील एका सोसायटीच्या गेटमध्ये असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी एका चोरट्याने ओढून नेली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. pic.twitter.com/IDfvPEqiqi
— News18Lokmat (@News18lokmat) October 8, 2022
आरोपीने गळ्यातील साखळी ओढल्यावर सुरुवातीला या महिलेला काहीच समजत नाही. ती एकाजागी उभा राहून पळ काढणाऱ्या आरोपीकडे पाहात राहाते. मात्र, हा आरोपी मागे वळून न पाहता अगदी वेगात कोणालाही काही कळायच्या आत इथून निघून जातो. चेन स्नॅचिंगची ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घराबाहेर उभ्या असलेल्या बहिणींसमोर भावाला उडवलं; कार अपघाताचा थरारक Video सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी स्नॅचर कैद झाला आहे. या घटनेनंतर आरोपी लगेचच फरार झाला. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, सोसायटीच्या आवारात येत चोरट्याने अशाप्रकारे सोनसाखळी चोरी केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना 25 सप्टेंबरची आहे, मात्र घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.