जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Jalna Crime: टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने आला अन् स्कूटी घेऊन पळाला, जालन्यातील घटनेचा LIVE VIDEO

Jalna Crime: टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने आला अन् स्कूटी घेऊन पळाला, जालन्यातील घटनेचा LIVE VIDEO

Jalna Crime: टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने आला अन् स्कूटी घेऊन पळाला, जालन्यातील घटनेचा LIVE VIDEO

Crime news: बाईकच्या शोरूममध्ये टेस्ट ड्राईव्हसाठी आलेल्या एका तरुणाने स्कूटी घेऊन पोबारा केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना शोरूमच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जालना, 9 फेब्रुवारी: बाईक आणि कार खरेदी करण्यापूर्वी शोरूमकडून संबंधित गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह (vehicle test drive) नागरिकांना देण्यात येते. अशाच प्रकारे जालन्यातही (Jalna) एका बाईकच्या शोरूममध्ये स्कूटीची टेस्ट ड्राईव्ह (Scooty test drive) घेण्यासाठी एका तरुणाने गाडी घेतली खरी पण ती स्कूटी घेऊन त्याने पोबारा केल्याचं समोर आलं आहे. ही संपूर्ण घटना बाईकच्या शोरूमबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद झाली आहे. (Caught in CCTV, man fled with Scooty in Jalna) शहरातील भोकरदन नाका येथील एन आर जी ऑटो या इलेक्ट्रिक स्कूटी शोरुममध्ये एक अनोळखी ग्राहक टेस्ट ड्राईव्हसाठी आला. यावेळी टेस्ट ड्राईव्हसाठी तो इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन गेला तो परतलाच नाही. हा प्रकार शोरुम मालकाच्या लक्षात येताच त्याने थेट पोलसांकडे धाव घेतली.

सदर बाजार पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती हा शोरूमच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. वाचा :  चेहऱ्यावर सिगारेटचे चटके, डोळ्यात खिळे ठोकले, प्रायव्हेट पार्टमध्ये… सोन्याच्या दागिन्यासह स्कूटी सुद्धा पळवली, बीडमधील घटना बीड मध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भरदिवसा एका सराफा व्यापाऱ्याला लुटण्याची घटना समोर आली आहे. या सराफा व्यापाऱ्याकडील लाखोचे दागिने आणि स्कूटी घेऊन चोरटे पसार झाले. अंबेजोगाई शहरात दिवसाढवळ्या घटलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली आहे. राहुल राठोड असं या सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे. चोरट्यांनी भरदिवसा सराफा व्यापारी राहुल राठोड यांची लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने डिकीत ठेवलेली स्कूटी घेऊन पोबारा केला. वाचा :  पाकिस्तानच्या पंजाबात 6 महिन्यांत 2400 महिलांवर बलात्कार; 90 जणींची हत्या 2 हजारांची नोट खाली पडल्याचं सांगत व्यापाऱ्याचे 9 लाख लांबवले चोरट्यांनी एका व्यापाराला चांगलेच गंडवल्याचा प्रकार जालन्यातून समोर आला आहे. तुमचे दोन हजार रुपये पडल्याचं सांगत व्यापाऱ्याला रोखलं आणि त्यानंतर व्यापाऱ्याकडे असलेली पैशांनी भरलेली बॅग घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 हजार रुपयांच्या नादात एका कापूस व्यापाऱ्याला तब्बल 9 लाख रुपयांची झळ सोसावी लागली. हा प्रकार बदनापूर मार्गावरील धोपतेशवर फाट्यावर घडला. जनार्दन चपटे असं या पीडित व्यापाऱ्याचे नाव असून त्याने जालन्यातील एचडीएफसी बँकेतून शेतकऱ्यांना देण्यासाठी 9 लाख रुपये काढले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात