मुंबई 04 नोव्हेंबर : वास घेऊन एखाद्या व्यक्तीचा किंवा गोष्टीचा माग काढण्याची अद्भुत क्षमता श्वानांकडे असते. गेल्या कित्येक वर्षांपासून, त्यांच्या याच क्षमतेचा वापर करून गुन्ह्यांच्या तपासकर्त्यांनी आत्तापर्यंत अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. पण, अशीच क्षमता आणखी एखाद्या प्राण्याकडे असू शकते, याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? श्वानांचा कट्टर शत्रू असलेला मांजर हा प्राणीदेखील तपासकार्यात मदत करू शकतो, ही बाब ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी शोधून काढली आहे. हेडी माँकमन, रोलँड ए. एच. व्हॅन ओरशॉट आणि मारिया गोर्ये यांच्या गटानं मांजरींबाबत महत्त्वाचं संशोधन जगासमोर मांडलं आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासात असं लक्षात आलं की, मांजरींच्या अंगावरील फर आपल्या आसपासच्या व्यक्तीच्या जेनेटिक मेटेरिअलचे ट्रेसेस टिकवून ठेवू शकते. महिलेसोबत बसमध्येच घडला धक्कादायक प्रकार, स्थानकाऐवजी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली बस या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी, संशोधकांनी 15 घरांतील 20 पाळीव मांजरींच्या शरीरावरून मानवी डीएनए सँपल जमा केले. ऑन साइट नमुने घेण्यासाठी त्यांनी प्रत्येकाच्या घरी भेट दिली. मांजरींच्या मालकांच्या त्वचेवरील पेशी त्यांच्या पाळीव मांजरींच्या शरीरावर आढळतात का? याचा शोध घेणं हा संशोधकांचा मुख्य उद्देश होता. संशोधकांनी प्रत्येक घरातील रहिवाशांना त्यांच्या मांजरीच्या वागणुकीबद्दल आणि सवयींबद्दल एक प्रश्नावली भरण्यास सांगितलं होतं. घरातील व्यक्ती पाळीव मांजरीला दिवसातून किती वेळा आणि किती वेळ गोंजरतात, याची माहिती मिळवण्यासाठी ही प्रश्नावली उपयुक्त ठरली. मांजरींच्या केसांमधून जमा केलेल्या सॅम्पल्सपैकी 80 टक्के सॅम्पल्समध्ये त्यांच्या मालकांच्या डीएनएचे ट्रेस आढळले आहेत. या अभ्यासात सहभागी झालेल्या मांजरींच्या अंगावरील केसांमध्ये असलेलं डीएनएचं प्रमाण आणि त्यांच्या मालकांना भेटून बराच वेळ गेल्यानंतरचं मांजरींच्या केसांवरचं डीएनएचं प्रमाण यात फार तफावत हेदी माँकमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिसून आली नाही. तसंच माणसांशी त्यांचा शेवटचा संपर्क झाल्यानंतर त्यांच्या अंगावरील केसांच्या लांबीतही काही विशेष फरक त्यांना जाणवला नाही. शिवाय, संशोधकांनी मांजरीच्या सॅम्पल्समधून जनरेट केलेले 70 टक्के डीएनए प्रोफाइल संबंधित व्यक्तींशी तंतोतंत मिळतेजुळते होते. हॉटेल रुममध्ये लावलेला छुपा कॅमेरा शोधून काढण्यासाठी वापरा ‘या’ ट्रिक्स या अभ्यासातून मिळालेला निष्कर्ष आशादायक वाटत आहे. कारण, पाळीव प्राणी डीएनए ट्रान्सफरमध्ये कसं योगदान देऊ शकतात याचं परीक्षण करणारा हा पहिला रिसर्च आहे. “गुन्हेगारी घटनांच्या तपासात मानवी डीएनएचं संकलन खूप महत्त्वाचं बनलं पाहिजे. पण, मांजरी आणि श्वानांसारख्या पाळीव प्राण्यांचा मानवी डीएनए ट्रान्सफरशी संबंध असतो, हे सिद्ध करणाऱ्या डेटाचा अभाव आहे,” असं फ्लिंडर्स युनिव्हर्सिटीतील फॉरेन्सिक शास्त्रज्ञ हेडी माँकमन यांनी Phys.org वर प्रकाशित झालेल्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, मांजर आणि श्वानासारखे पाळीव प्राणी घरातील रहिवाशांची किंवा बाहेरून घरात आलेल्या व्यक्तींची उपस्थिती आणि हालचाल निश्चित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. याबाबत आणखी सखोल संशोधन झालं तर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मांजरसुद्धा योगदान देऊ शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







