जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महिलेसोबत बसमध्येच घडला धक्कादायक प्रकार, स्थानकाऐवजी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली बस

महिलेसोबत बसमध्येच घडला धक्कादायक प्रकार, स्थानकाऐवजी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली बस

महिलेचा प्रतिकात्मक फोटो

महिलेचा प्रतिकात्मक फोटो

पुण्याहून धुळ्याकडे जात असलेल्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाचे पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अहमदनगर 27 ऑक्टोबर : चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. घरफोडी आणि दरोड्याच्या अनेक घटना आपण दररोज ऐकत किंवा वाचत असतो. मात्र, बऱ्याचदा चोर गर्दीच्या ठिकाणीही पैसे आणि दागिन्यांवर डल्ला मारतात. अशीच एक घटना आता अहमदनगरमधून समोर आली आहे. पुण्याहून धुळ्याकडे जात असलेल्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाचे पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरोड्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी आवळल्या मुसक्या; अंधारात सिनेस्टाईल पाठलाग 26 ऑक्टोबर रोजी बाभळेश्वर ते कोपरगाव दरम्यान ही घटना घडली आहे. दागिने चोरीला गेल्याचं सदर प्रवासी महिलेच्या लक्षात येताच तिने ही बाब चालक आणि वाहकाच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी बस चालक कदम यांनी बस थेट कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नेली आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यावेळी तिथे उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी राजू पुंड जालिंदर तमनर आणि महिला पोलीस कर्मचारी मंजुषा त्रिभुवन यांनी बसमधील प्रत्येक प्रवाशाच्या बॅगची तपासणी करत झडती घेतली. मात्र ते सोन्याचे गंठण कुठेच सापडले नाही. राहता तालुक्यातील लोणीजवळील चिंचपुरच्या रहिवाशी असलेल्या अर्चना संतोष घोडेकर यांचे हे दागिने चोरीला गेले आहेत. अंगाला चिखल अन् लोशन लावून मध्यरात्री करायचे घरफोडी, मध्यप्रदेशमधील टोळीला पुण्यात अटक ठाण्यात दरोड्याचा प्लॅन फसला - दुसऱ्या एका घटनेत दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मुंबईतून बाहेरगावी किंवा फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या बंद घरांवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चव्हाण आणि काळे टोळीतील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील कस्तुरबा मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. काही इसम दरोडा टाकण्यासाठी बोरिवली येथील हयुदाई शोरूम, बडोदा बँकेच्या समोर, दत्तपाडा रोड येथे एकत्र येणार असल्याची माहिती कस्तुरबा मार्ग पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी पंच आणि तपासाची टीम तयार करून त्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी बडोदा बँकेच्या समोर अंधारामध्ये काही संशयित हे एका ऑटो रिक्षाने आले. बडोदा बँकेच्या एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खात्री झाल्याने तसेच त्यांच्या हालाचाली संशयास्पद दिसून लागल्याने पोलीसांनी त्यांचा पाठलाग केला व दोन आरोपींना अटक केली तर तीन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात