जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / घृणास्पद! श्वानावर बलात्कार; video व्हायरल होताच गुन्हा दाखल

घृणास्पद! श्वानावर बलात्कार; video व्हायरल होताच गुन्हा दाखल

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका व्यक्तीने चक्क श्वानावर बलात्कार केला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • -MIN READ Trending Desk Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

    दिल्ली, 27 फेब्रुवारी : महिलांवरील लैंगिक अत्याचाराची अनेक प्रकरणं दिल्लीमधून समोर आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून हत्येच्या घटनेत देखील वाढ झाली आहे. मात्र आता राजधानी दिल्लीमधून एक नवीनच प्रकरण समोर आलं आहे. इथे एका भटक्या कुत्र्यावर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना दिल्लीतील हरिनगर भागात घडली असून, प्रकरणाचा तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एका उद्यानात कुत्र्यावर बलात्कार करण्यात आला होता. या संदर्भात ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलं आहे. व्हिडीओ व्हायरल  जेव्हा हा माणूस एका मादी कुत्र्यावर बलात्कार करत होता तेव्हा कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोकांनी 25 फेब्रुवारी रोजी हरिनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रविवारी म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी कलम 377/11 आणि प्राणी छळ कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे आणि मुक्या प्राण्यावर अत्याचार करणारी व्यक्ती कोण आहे, याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. यापूर्वीही घडली आहे अशीच घटना   या पूर्वीही उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातून असंच प्रकरण समोर आलं होतं. इथं एका व्यक्तीने मादी कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. जेव्हा तो माणूस हे घृणास्पद कृत्य करत होता तेव्हा त्याच्या सुनेनेच त्याचा व्हिडिओ बनवला होता. मुंबईमध्ये फिरतोय खतरनाक व्यक्ती; ‘एनआयए’कडून अलर्ट जारी! सासऱ्याची नजर तिच्यावर पडताच आरोपीने त्याच अवस्थेत सुनेशी हुज्जत घालत तिचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सुनेने पीपल फॉर अ‍ॅनिमल (पीएफए) या प्राणीप्रेमी संस्थेशी संबंधित असलेल्या टीमला याबद्दल माहिती दिली. तिने सासऱ्याने कुत्र्याशी केलेल्या क्रूरतेची माहिती दिली होती. पीडितेचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पीएफए टीमने तात्काळ 60 वर्षीय आरोपीला अटक करून कारागृहात रवानगी केली होती. आरोपीचा शोध सुरू   दरम्यान, आता हरिनगरमधून अशीच घटना उघडकीस आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नागरिक त्या आरोपीला अटक करण्याची मागणी करत आहेत. पोलीस आता या व्हिडीओच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात