गोंदिया, 28 जून, रविंद्र सपाटे : गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची सोशल मीडियावर बदनामी केल्याचं समोर आलं आहे. यासाठी पतीनं पत्नीच्या भावाच्या नावानं बनावट अकाउंट तयार केलं. त्यानंतर या अकाउंटवर पत्नीचे खासगी फोटो पोस्ट केलं. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? घटनेबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच रवींद्र आणि रविना ( दोन्ही नावं बदललेली आहेत) यांचं चार महिन्यांपूर्वी लग्न झालं आहे. त्यांनी लग्नानंतर अनेक फोटो आणि व्हिडीओ काढले. ज्यामध्ये त्यांच्या खासगी व्हिडीओंचा देखील समावेश आहे. मात्र त्यानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये काही कारणामुळे वाद होऊ लागला. वाद वाढल्यानं पत्नी महिनाभरापासून आपल्या माहेरी राहात आहे.
एका बकऱ्यावरून वातावरण तापलं, दंगल नियंत्रण पथक रवाना ; ठाण्यात नेमकं काय घडलं?गुन्हा दाखल याचदरम्यान 23 आणि 24 जून रोजी त्यांचे खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे व्हिडीओ पत्नीच्या निदर्शनास आले. हे व्हिडीओ पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने या प्रकरणी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पतीनेच बनावट अकाऊंट तयार करून हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचं तपासात समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

)







