नवी मुंबई, 25 मार्च : महागड्या गाड्या कंपनीत भाड्याने (Car rent) लावण्याचे आमिष दाखवून त्या परस्पर विकणाऱ्या दोघा जणांना पनवेल (Panvel Police) तालुका पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक आरोपी फरार आहे. धक्कादायक म्हणजे, चौथ्या आरोपीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणामुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.
पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबद्दल खुलासा केला आहे. डेरवली येथील ज्ञानेश्वर पेढेकर यांची गाडी दरमहा 18 हजार रुपये भाड्याने लावून मारुती एरटिगा कार नंबर एम एच 43 ए एन 4397 ही ऑगस्ट 2020 मध्ये राजशेखर चिक्के गौडा याने नेलेली होती. सुरुवातीस त्यांना 1 ते 2 महिन्याचे भाडे मिळाले. मात्र त्यानंतर भाडे न मिळाल्याने त्याने राजशेखर यांच्याकडे भाड्याची मागणी केली. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पेढेकर यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अशा प्रकारे अनेक लोकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
आता आठवड्यातून 3 दिवस सुट्टी मिळणार? काय म्हणाले केंद्रीय मंत्री संतोष गंगवार
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार व त्यांच्या पथकाने आरोपींची माहिती मिळविण्यास सुरूवात केली. सुरज नारायण पाटील (वय 34, राहणार पुणे) आणि जगदीश उर्फ चुंनीलाल चौधरी (वय 33, राहणार कोपरखैरणे) यांना पुणे आणि नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी सर्व वाहनांचे बनावट कागदपत्रे तयार करून विविध ठिकाणी विक्री केल्याची माहिती दिली.
मी इथं का बरं आलो होतो? तुम्हालाही त्या क्षणी काही आठवत नाही का?
त्याप्रमाणे पोलिसांच्या पथकाने नागपूर, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी जाऊन 41 लाख 50 हजार रुपयांची 10 वाहने हस्तगत केली. यातील राजशेखर चिक्कीगौडा या आरोपींने आत्महत्या केली आहे. तर आणखी एक आरोपी फरार आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर डी बी मार्ग पोलीस ठाणे, मुंबई हद्दीत एका संगणक व्यवसायिकाला संगणकाचा साहित्यामध्ये 1 कोटी 18 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. डॉक्टर डी बी मार्ग पोलीस ठाण्याच्या आरोपींना शोधत होते. आरोपींना अटक केल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: नवी मुंबई