मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! पिंपरीत तब्बल 93 लाखांचा अपहार, मालकाच्या अनुपस्थित खोट्या सह्या अन्

धक्कादायक! पिंपरीत तब्बल 93 लाखांचा अपहार, मालकाच्या अनुपस्थित खोट्या सह्या अन्

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

ही घटना सन 2013 ते 2021 या कालावाधीत पिंपरीतील फोल्कोईमोटर्स प्रा. ली, मोरवाडी येथे घडल्याची माहिती मिळाली आहे.

  • Published by:  News18 Desk
पिंपरी, 17 ऑगस्ट : Bitcoin मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यक्तीला 14 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. पिंपरीतील ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खोटे दस्तऐवज करून 92 लाख 98 हजारांचा घोटाळा झाल्याचे आले आहे. कंपनीचे मालकाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून खोट्या दस्तऐवज करत कंपनीतून हा अपहार करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही घटना सन 2013 ते 2021 या कालावाधीत पिंपरीतील फोल्कोईमोटर्स प्रा. ली, मोरवाडी येथे घडल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी एका महिलेने काल मंगळवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राकेश धवन उर्फे राकेशकुमार धवन (वय, 54, रा. अमेरिका), दीपक अंकुश क्षीरसागर (वय 37, रा.चिखली), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची यादी आहे. फिर्यादीने काय म्हटले - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या भारतात नसताना त्यांनी कंपनीचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी आरोपींना अधिकार दिले होते. या अधिकारांचा गैरवापर करण्यात आला आणि फाल्कोई मोटर्स प्रा. लि. कंपनीच्या 2016, 2017, 2018 च्या बोर्ड मिटींगमध्ये फिर्यादी या हजर असल्याचे दाखवण्यात आले. तसेच आरोपी दीपक क्षीरसागर याने फिर्यादीची खोटी सहीदेखील केली केली. इतकेच नव्हे तर या खोट्या सहीद्वारे आरोपीने स्वत:ला फिर्यादींचा प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याचे दाखवले. हेही वाचा - Bitcoin मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 14 लाखांचा गंडा, पिंपरी-चिंचवडमधील घटना अन् कागदपत्रे तशीच अपलोड केली... आरोपीने कंपनीच्या 2015 ते 2018 ऑडीट रिपोर्ट, बॅलेन्स शीट, प्रॉफीट अँण्ड लॉस स्टेटमेंट आदी कागदपत्रांवर फिर्यादी यांच्या खोट्या सह्या केल्या. तसेच ही सर्व कागदपत्रे सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड केली आणि त्यांचा वापर कंपनीच्या कायदेशीर कामासाठी केला. तसेच आरोपीने संगनमत करत खोटे दस्तऐवज तयार केले आणि तब्बल 92 लाख 98 हजार 900 रुपयांचा अपहार केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. मागील दोन ते तीन दिवसांत फसवणूकीच्या या मोठ्या घटना समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
First published:

Tags: Money fraud, Pimpri chinchawad, Pune, Pune crime news

पुढील बातम्या