जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Bitcoin मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 14 लाखांचा गंडा, पिंपरी-चिंचवडमधील घटना

Bitcoin मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 14 लाखांचा गंडा, पिंपरी-चिंचवडमधील घटना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

राकेश ईश्वरदास लोहार (वय-38, यमुनानगर, निगडी) यांना बिटकॉईनमध्ये गुंतवणुक करून नफा मिळवून देण्याचे अमिष देण्यात आले होते.

  • -MIN READ Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पिंपरी, 16 : पुण्यातील एका महिलेला एका कंपनीत पैसे गुंतवायचे होते. मात्र, मात्र, या केएफसी ची फ्रॅंचाईजी घेताना एका महिलेची तब्बल 79 लाख रुपयात फसवणूक करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच आता Bitcoin मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने पिंपरी-चिंचवडमध्ये 13 लाख 67 हजारांचा अपहार करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - राकेश ईश्वरदास लोहार (वय-38, यमुनानगर, निगडी) यांना बिटकॉईनमध्ये गुंतवणुक करून नफा मिळवून देण्याचे अमिष देण्यात आले होते. आमिष देऊन त्यांची तब्बल 13 लाख 67 हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 8 एप्रिल ते 3 मे या कालावधीमध्ये यमुनानगर, निगडी येथे घडली आहे. याप्रकरणी राकेश लोहार यांनी निगडी पोलीस ठाण्यात काल सोमवारी याबाबत फिर्याद दिली. अशी झाली फसवणूक - याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झालेल्या फिर्यादी यांना वेगवेगळ्या तीन मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला होता. तसेच बिटकॉईनमध्ये गुंतवणुक करण्याचे अमिष त्यांना देण्यात आले. बिटकॉईनमध्ये नफा मिळेल, असे सांगत आरोपीने फिर्यादी यांना व्हॉट्सअपवर एक लिंक पाठवली होती. लिंक पाठवल्यानंतर ती लिंक फिर्यादीने ओपन केली आणि त्यात आपली सर्व माहिती भरली तसेच बायकॉईन हे ॲपही डाऊनलोड केले. हेही वाचा -  KFC फ्रँचाईजी उभारण्याचं रंगवलं स्वप्न; मात्र पुण्यातील महिलेला तब्बल 80 लाखांचा लावला चुना यानंतर ॲपच्या माध्यमातून फिर्यादीने तब्बल 13 लाख 67 हजार रुपये भरले. मात्र, त्यांना कोणताच परतावा मिळाला नाही. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. तसेच त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात