मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक : 300 फूट खोल दरीत कोसळली बस; 13 जणांचा जागीच मृत्यू

धक्कादायक : 300 फूट खोल दरीत कोसळली बस; 13 जणांचा जागीच मृत्यू

जास्त प्रवासी भरल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जास्त प्रवासी भरल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जास्त प्रवासी भरल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    उत्तराखंड, 31 ऑक्टोबर : उत्तराखंडची (Uttarakhand News) राजधानी देहरादूनमध्ये रविवारी मोठा अपघात (Big Accident) घडला आहे. विकास नगरमध्ये चकराताजवळ बस दरीत पडल्यामुळे 13 जणांचा मृत्यू (13 Death) झाला आहे. तर अनेक जणं जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सांगितलं जात आहेकी, बसमधील प्रवासी अधिकतर लोक एकाच गावात राहणारे होते. (Bus crashes into 300 foot deep ravine 13 people died on the spot) हा अपघात रविवारी सकाळी 8 वाजता झाला. गाडी 1300 फूट खोल दरीत कोसळल्यामुळे आरडाओरडा सुरू झाला. जखमींचा आरडाओरडा ऐकून गावकरी घटनास्थळी पोहोचले. बसच्या खाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. गावकऱ्यांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. यानंतर तातडीने पोलिस आणि SDRF ची टीमचं बचाव अभियान सुरू आहे. हे ही वाचा-शेजारच्या इमारतीतील लेकही मदतीला नाही येऊ शकला; एकट्या राहणाऱ्या आईचा भयावह अंत पीएम मोदींनी अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना 2-2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. जखमींना 50 हजार रुपये देण्यात आले आहेत. ही रक्कम PMNRF मधून देण्यात येईल. ओवरलोडिंगमुळे अपघाताची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा अपघात ओवरलोडिंगमुळे झाला आहे. बस लहान होती, ज्यात 25 प्रवासी होते. सांगितलं जात आहे की, ज्या मार्गाने बस जात होती, तेथे बसेसची संख्या कमी होती. त्यामुळे खूप जास्त प्रवासी एकाच बसमध्ये बसले होते. उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी अपघातावर शोक व्यक्त केला आहे. धामीने ट्वीट करून या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Accident, Private bus, Uttarakhad

    पुढील बातम्या