जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / आजारी कुटुंबाचं नाही झेपलं ओझं; मुलीनं आई अन् कोमातील भावाला अन्नातून विष देऊन संपवलं, स्वतःही केली आत्महत्या

आजारी कुटुंबाचं नाही झेपलं ओझं; मुलीनं आई अन् कोमातील भावाला अन्नातून विष देऊन संपवलं, स्वतःही केली आत्महत्या

आजारी कुटुंबाचं नाही झेपलं ओझं; मुलीनं आई अन् कोमातील भावाला अन्नातून विष देऊन संपवलं, स्वतःही केली आत्महत्या

कुटुंबातील लोकांच्या आजारीपणाचं ओझं न झेपल्यानं एका मुलीनं (daughter) टोकाचं पाऊल उचललं आहे. तिने आपल्या सात वर्षांपासून कोमात असणाऱ्या भावाला (Brother was in come from last 7 years) आणि जखमी आईला (Mother) अन्नातून विष (Poisoning) देऊन हत्या (murder) केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लुधियाना, 17 एप्रिल: कुटुंबातील लोकांच्या आजारीपणाचं ओझं न झेपल्यानं एका मुलीनं (daughter) टोकाचं पाऊल उचललं आहे. तिने आपल्या सात वर्षांपासून कोमात असणाऱ्या भावाला (Brother was in come from last 7 years) आणि जखमी आईला (Mother) अन्नातून विष (Poisoning) देऊन हत्या (murder) केली आहे. विशेष म्हणजे संबंधित मुलीनेही तेचं अन्न खाऊन स्वतः लाही संपवलं (Daughter commits suicide) आहे. एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. भाऊ सात वर्षांपासून कोमात आणि आई सतत आजारी असल्यानं येणाऱ्या विविध अडचणींना त्रासलेल्या मुलीनं अशाप्रकारे आपल्या कुटुंबाला संपवलं आहे. संबंधित घटना पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील सोढीवाल येथील आहे. पोलीसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन 174 कलमांतर्गत कारवाई केली आहे. सोढीवाल गावात गेल्या चार दिवसांत एकाच कुटुंबातील तीन सदस्यांवर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. संबंधित 37 वर्षीय मृत मुलाचं नाव गुरप्रीत सिंह सोनी असं मृत आईचं नाव जसबीर कौर असून त्या 58 वर्षांच्या होत्या. या दोघांना 27 वर्षीय मनदीप कौरनं अन्नातून विष दिलं आणि स्वतःही ते अन्न खाल्लं आहे. एएसआय तीरथ सिंह यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, 37 वर्षीय गुरप्रीत 7 वर्षांपर्वी घराच्या छतावरून पडला होता. त्यानंतर तो वर्षांपासून कोम्यात गेला. त्यामुळे पूर्ण परिवार मानसिक त्रासाला सामोरं जात होतं. दरम्यानच्या काळात, काही दिवसांपूर्वी आई जसबीर कौरही जखमी झाल्या. घरातील आई आणि भाऊ दोघंही आजारी पडल्यानं मुलगी मनदीप कौरवर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवस मानसिक त्रास सहन केल्यानंतर तिने अखेर आपल्या कुटुंबाला संपवलं आहे. हे ही वाचा- बुलडाण्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला महिला एसटी वाहकाचा मृतदेह; घातपाताचा संशय दैनिक भास्कर ने दिलेल्या वृत्तानुसार, मानसिक त्रासाला कंटाळलेल्या मनदीप कौरनं 12 एप्रिल रोजी अन्नात विषारी औषध मिसळलं आणि ते अन्न आपल्या आईला आणि कोम्यात असणाऱ्या भावाला खायला दिलं. शिवाय तिनेही तेच अन्न खाल्लं. यामुळे सर्वजण बेशुद्ध पडले. यानंतर घराशेजारी राहणाऱ्या एक महिला घरी आल्यानंतर संबंधित घटना उजेडात आली. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी तिघांनाही एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी 13 एप्रिल रोजी आई, 14 एप्रिल रोजी मुलगा आणि शनिवारी सकाळी मुलीचा मृत्यू झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात