बुलडाण्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला महिला एसटी वाहकाचा मृतदेह; घातपाताचा संशय

बुलडाण्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला महिला एसटी वाहकाचा मृतदेह; घातपाताचा संशय

Crime in Buldhana: बुलडाण्यात एका महिला वाहकाचा (Female conductor) गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह (Dead body found with throat slit) आढळला आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. घातपाताचा (murder) संशय व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

राहुल खंडारे, बुलडाणा, 17 एप्रिल: बुलडाण्यातील अंत्री खेडेकर येथे एका महिला वाहकाचा (Female conductor) गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह (Dead body found with throat slit) आढळला आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी हा मृतदेह आढळल्यानंतर ही बातमी गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन गर्दी पांगवली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची व्यवस्थित पाहाणी केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. स्थानिक पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

संबंधित घटना बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीजवळील अंत्री खेडेकर या गावाजवळ घडली आहे. अंत्री खेडेकर या गावापासून काही अंतरावर शुक्रवारी सकाळी हा मृतदेह आढळल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. मृत महिला वाहकाचं नाव माधुरी मोरे असून त्या अंत्री खेडेकर या गावच्या रहिवासी आहेत. तर त्या बुलडाणा आगारात महिला वाहक म्हणून कार्यरत होत्या. गुरूवारी रात्री त्यांच्यासोबत घातपात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे ही वाचा- मित्राच्या पत्नीला धमकावून ठेवले शारीरिक संबंध आणि लाखो रुपयेही बळकावले

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंढेरा  पोलीस आणि फोरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर मृतदेह चिखली येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. संबंधित महिला वाहकाच्या मृत्यूमागील नेमक्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पण या मृत्यूबाबतची कोणतीही ठोस माहिती अद्याप पोलिसांच्या हाती सापडली नाही. चिखली पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: April 17, 2021, 9:08 AM IST

ताज्या बातम्या