जयपुर, 3 ऑक्टोबर : जयपूरच्या सुरभी कुमावत हिच्या मृतदेहाशेजारील नोट पाहून कोणालाही धक्का बसेल. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणात तपास केला तर ती महिला नॅशनल बँकेच्या मार्केटिंग मॅनेजर सुरभी कुमावत असल्याचं समोर आलं. पंख्याला गळफास लावून महिलेने जीव दिला. सुरभीचे पती साहिद अली यांनी रविवारी सकाळी 7.30 वाजता पोलिसांना फोन करून सुरभीने स्वत:चा जीव घेतल्याचं सांगितलं. पोलीस येईपर्यंत त्याने सुरभीला पंख्याला लावलेल्या रश्शीवरुन खाली उतरवलं होतं. नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की, 2016 मध्ये सुरभीचं लग्न झालं होतं. तिने साहिद अलीसोबत प्रेम विवाह केला होता. कुटुंबीयांविरोधात हे लग्न झालं होतं. सुरभी आणि साहिद दोघांनी 2016 मध्ये गाजियाबादमधील आर्य समाज मंदिरात लग्नाच्या बंधनात अडकले होते. साहिद सहावी पास आहे, तर सुरभीने नुकतच मुहाना मंडी रोज केसर चौकात यूनिक सफायरमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. 11 जून 2022 पासून पती आणि मुलीसह सुरभी या फ्लॅटमध्ये राहत होती. सुरभी पंजाब नॅशनल बँकेतील नेहरू पॅलेस स्थित ब्रान्चमध्ये मार्केटिंग मॅनेजरच्या पदावर काम करीत होती. लग्न, धमकी, राग अन् संसाराचा The End; 48 तासात चक्र फिरलं, अन् कविताचा गेला जीव त्या नोटमध्ये काय लिहिलं? मला कोणी समजून घेत नाही. प्रत्येक जण माझा वापर करून घेण्याचा प्रयत्न करतो. मला फक्त आनंदात राहायचं आहे आणि मी कोणालाही त्रास देऊ इच्छित नाही. माझ्या पतीलाही माझा राग येतो, तो मला सोडून देण्याची धमकी देतो. माझा वापर स्वार्थासाठी केला जात आहे. मी सर्व सोडून जात आहे. मला माझ्या मुलीसाठी वाईट वाटतय. मी यापुढे तिची काळजी घेऊ शकणार नाही. सुरभीची ही नोट वाचल्यानंतर तिच्या कुटुंबाकडून आक्रोश व्यक्त केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.