मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बुलढाण्यात किडनॅप करण्याचा कट उधळला, दोन बड्या हस्तींचा अपहरणाचा होता प्लॅन

बुलढाण्यात किडनॅप करण्याचा कट उधळला, दोन बड्या हस्तींचा अपहरणाचा होता प्लॅन

आरोपींचा फोटो

आरोपींचा फोटो

बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंटेलिजन्स ब्यूरो अर्थात आयबीने तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Chetan Patil

राहुल खंदारे, बुलढाणा, 14 सप्टेंबर : प्रत्येकाला आयुष्यात खूप मोठं व्हायचं असतं. खूप पैसे कमवावं आणि प्रचंड श्रीमंत व्हावं, अशी अनेकांची इच्छा असते. पण श्रीमंत होण्यासाठी खूप कष्टही करावे लागतात हे काहीजण विसरतात. विशेषत: तरुणांना तर सोप्या मार्गाने प्रचंड पैसा कमवावा असा मार्ग हवा असतो. मेहनत केली तरच फळ मिळेल याची त्यांना कदाचित जाणीवही असते. पण त्यांना 'कळतं पण वळत नाही' अशा म्हणीप्रमाणे त्यांची मेहनत करण्याची इच्छा नसते. ते काम करण्यासाठी पुढे सरसावत नाहीत. 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' अशा म्हणीप्रमाणे ते फक्त उणाडक्या करत फिरत असतात. तर काही जण श्रीमंत होण्यासाठी अतिशय भयानक आणि वाईट मार्गाला जाण्याचा विचार करतात. ते अराजकता माजवून पैसे कमावण्याचा निर्धार करतात. त्यांचा हा निर्धार खूप चुकीचा असतो. ज्या गोष्टी वाईट आहेत त्या वाईटच आहेत. त्यामुळे वाईट क्लृप्त्या मनात ठेवून पैसे कमावण्याचं धाडस करणाऱ्या तरुणांना योग्य फळ मिळतंच. तशीच काहीशी घटना बुलढाण्यात बघायला मिळाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंटेलिजन्स ब्यूरो अर्थात आयबीने तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या तीनही आरोपींनी श्रीमंत होण्यासाठी अराजकतेचा भयानक मार्गाला जाण्याचं ठरवलं होतं. पण आयबीने वेळीच त्यांच्या मुसक्या आवळल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या आरोपींचा बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक भाईजी चांडक आणि मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चैनसुख संचेती यांना अपहरण करण्याचा कट होता. त्यासाठी त्यांनी तयारी देखील केली होती. पण त्यांच्या कुकृत्याचा सुगावा इंटेलिजन्स ब्यूरोला लागली आणि तपासाला सुरुवात झाली. आयबीने तीनही आरोपींना बुलढाण्यातून बेड्या ठोकल्या आहेत.

(तरुणीला फोन का करतो? असे म्हणत पोलिसाकडून सतत मारहाण, पुण्यातील किर्तनकाराचं भयानक पाऊल)

झटपट श्रीमंत होण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या तिघांना दिल्लीत आयबीने अटक केली. अटक करण्यात आलेले तिघेही बुलडाणा शहरातील रहिवाशी असल्याचे समोर आल्यानंतर त्या आरोपींना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. श्रीमंत होण्यासाठी बुलडाणा अर्बनचे संस्थापक भाईजी चांडक आणि मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चैनसुख संचेती यांना किडनॅप करण्याचा प्लॅन तिघांनी रचल्याचे समोर आलं. बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी तशी माहिती दिली आहे.

मिर्झा आवेज बेग (21), शेख साकीब शेख अन्वर (20), उबेद खान शेर खान (20) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते बुलडाणा शहरातील शेर-ए-अली चौकातील राहणारे आहेत. तिघेही काही दिवसांआधी दर्शनाकरिता अजमेर येथे गेले होते. त्यांनीबेरोजगारीला कंटाळून श्रीमंत होण्यासाठी वाममार्गाचा प्लॅन आखला. बँक लुटण्यासाठी त्यांनी एक एअर गन देखील विकत घेतली होती, अशीदेखील धक्कादायक माहिती समोर आली आहे.

First published:

Tags: Crime, Kidnapping