जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / बहिणीकडे रहायला आलेल्या मामानं भाचीसोबत केलं भयंकर कृत्य, बुलडाणा हादरलं

बहिणीकडे रहायला आलेल्या मामानं भाचीसोबत केलं भयंकर कृत्य, बुलडाणा हादरलं

बहिणीकडे रहायला आलेल्या मामानं भाचीसोबत केलं भयंकर कृत्य, बुलडाणा हादरलं

बहिणीकडे रहायला आलेल्या मामाची भाचीवर नजर, अल्पवयीन मुलीसोबत घडला भयंकर प्रकार

  • -MIN READ Buldana,Buldana,Maharashtra
  • Last Updated :

राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा : मामा आणि भाची हे नातं खूप वेगळं असतं. भाचीचे हट्ट हक्काने पुरवणारा मामा असतो. मामा आणि भाची एक मित्र मैत्रिणीसारखं अगदी हक्काचं नातं असतं. मात्र याच नात्याला काळीमा फासणारी घटना बुलडाण्यात घडली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बहिणीकडे असं राहायला आलेलं असताना त्याची नजर सतत भाचीवर होती. अखेर त्याने संधीचा फायदा घेतला आणि तिच्यासोबत भयंकर कृत्य केलं. घरात कोणी नाही ते पाहून त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन भाची आहे याचंही भान त्याला उरलं नाही. त्याने तिच्यावर बलात्कार केला.

News18लोकमत
News18लोकमत
पती दुबईतून आला त्याच रात्री पत्नीने केली हत्या, डायरीतून मिळालं धक्कादायक कारण

40 वर्षीय नराधम आपल्या बहिणी कडे राहायला आला होता त्यावेळी त्याची नजर 10 वर्षीय आपल्या भाचीवर पडली आणि ती वासनेची शिकार झाली. घरी कुणी नसल्याचे पाहून नराधमाने 10 वर्षीय चिमुकली भाचीला उचलून नेले.

भंडाऱ्यातील बहुचर्चित सोनी हत्याकांड, तब्बल 9 वर्षांनी मृत मुलाच्या वाढदिवशीच आला निकाल

नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलीनं आई घरी आल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला. या घटनेची तक्रार पीडितेच्या आईनं पोलिसात दिली आहे. आरोपीविरोधात पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात