जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / खळबळजनक! मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला जाब विचारायला गेलेला जवान, मृतदेहच घरी पोहोचला

खळबळजनक! मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला जाब विचारायला गेलेला जवान, मृतदेहच घरी पोहोचला

खळबळजनक! मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला जाब विचारायला गेलेला जवान, मृतदेहच घरी पोहोचला

बीएसएफ जवानाच्या मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्या मुलाच्या घरी समजवायला गेलेल्या जवानाची हत्या झाली.

  • -MIN READ Trending Desk Gujarat
  • Last Updated :

    अहमदाबाद 27 डिसेंबर : गुजरातमधील नडियाड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जमावाने बीएसएफ जवानाला मारहाण करून त्याची हत्या केली आहे. बीएसएफ जवानाच्या मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्या मुलाच्या घरी समजवायला गेलेल्या जवानाची हत्या झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत जवान शनिवारी चकलासी गावात एका 15 वर्षीय मुलाच्या घरी गेला होता. त्या मुलानेच कथितरित्या व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केल्याची माहिती होती. पण, मुलाच्या कुटुंबीयांनी जवानावर हल्ला करून त्याला बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबातील काही जण जखमी झाले आहेत. मित्रासोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणावर तलवार, कोयत्याने सपासप वार; पुणे हादरलं या संदर्भात ‘नवभारत टाईम्स’ने वृत्त दिलंय. आरोपी मुलगा ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेत बीएसएफ जवानाची मुलगीही शिकते. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचीही चर्चा आहे, मात्र मुलाने मुलीचा अश्लील व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केला होता. यानंतर बीएसएफ जवान त्याच्या कुटुंबीयांसह मुलाच्या कुटुंबीयांशी बोलण्यासाठी गेला. पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, जवान पत्नी, दोन मुलं आणि पुतण्यासोबत मुलाच्या घरी गेला होता, पण त्याचं म्हणणं ऐकण्याऐवजी मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी विरोध केला असता जवानावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणाची दखल घेत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही या प्रकरणी ट्विट केलं आहे. ‘गुजरातमधील एका मुलाने बीएसएफ जवानाच्या मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला. जवान मुलाच्या घरी गेल्यावर मुलाच्या घरच्यांनी त्याची हत्या केली. ही बातमी चर्चेबाहेर आहे, त्याची बातमीही नाही. भरदिवसा एका सैनिकाची हत्या होणं ही आपल्या सर्वांच्या तोंडावर चपराक आहे. गुंडांची हिंमत किती वाढली आहे,’ असं स्वाती मालीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपीच्या गावातील सात जणांनी मिळून जवानावर लाठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. शहीद जवान बीएसएफ 56 मेहसाणामध्ये तैनात होता. या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहिणीची सोयरीक मोडल्याचा जाब विचारायला गेला तो परतलाच नाही; लातूरच्या घटनेने खळबळ जवान आणि त्याच्या कुटुंबावर हल्ला करणारे सर्व आरोपी घटनेनंतर गाव सोडून पळून गेले होते. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 302, 307, 323, 504, 143, 147, 149 अन्वये गुन्हा दाखल केला होता. सर्व सात आरोपींना सोमवारी दुसऱ्या गावातून पकडण्यात आलं. आता मंगळवारी आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात