जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / छावणीत जवानाची आत्महत्या; सर्विस बंदुकीने स्वत:लाच संपवलं

छावणीत जवानाची आत्महत्या; सर्विस बंदुकीने स्वत:लाच संपवलं

छावणीत जवानाची आत्महत्या; सर्विस बंदुकीने स्वत:लाच संपवलं

गोळीचा आवाज ऐकून संपूर्ण छावणीत खळबळ उडाली. त्यावेळी सोबतीचेही अलर्ट झाले. काही वेळानंतर जवानाने स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केल्याचं समोर आलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

चंदीगड, 27 मे : पंजाबमधील (Punjab News) फाजिल्कामध्ये एका बीएसएफ (BSF Jawan Suicide) जवाना ने आपल्या सर्विस बंदुकीने स्वत:लाच गोळी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवान गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्यात होता. पोलीस कुटुंबीयांच्या जबाबानंतर कारवाई करतील.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील मारीपाली गावातील निवासी केनबोनिया रामलू (30 )बॉर्डर रोड पर 52 बटालियनमध्ये तैनात होते. सध्या ते बीएसएफ छावणीत राहत होते. त्यांनी छावणीतच सर्विस बंदुकीने स्वत:ला गोळी घातली. गोळीचा आवाज ऐकून संपूर्ण छावणीत खळबळ उडाली. त्यावेळी सोबतीचेही अलर्ट झाले. काही वेळानंतर जवानाने स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केल्याचं समोर आलं.

जाहिरात

तपास अधिकारी मिल्ख राज यांनी सांगितलं की, बीएसएफच्या एका जवानाने आपल्या सर्विस बंदुकीने स्वत:वर गोळी झाडली. ते या प्रकरणात तपास करीत आहेत.  मृतक केनबोनिया रामलू तेलंगनाच्या मारीपाली गावात राहत होते. अद्याप जवानाच्या आत्महत्येमागील कारण कळू शकलेलं नाही. तरी या प्रकरणात तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात