श्रीनगर, 27 मे : लडाखमधील तुरतुक सेक्टरमधील एका रस्ते अपघातात आतापर्यंत भारतीय सैन्याच्या 7 जवानांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अन्य जणं गंभीर जखमी झाले आहेत. सैन्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. (7 Indian Army soldiers lost their lives so far in a vehicle accident in Turtuk sector Ladakh)
गंभीर जखमी असलेल्या जवानांना भारतीय वायुसेनाच्या माध्यमातून योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ज्या गाडीचा अपघात झाला त्यात 26 जवान प्रवास करीत होते. रस्ते अपघातात भारतीय सैन्याची गाडी श्योक नदीत कोसळली.
7 Indian Army soldiers lost their lives so far in a vehicle accident in Turtuk sector (Ladakh), grievous injuries to others too. Efforts on to ensure best medical care for injured, incl requisition of air effort from IAF to shift more serious ones to Western Command: Army Sources
— ANI (@ANI) May 27, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी 19 जखमी जवानांना C17 मार्फत चंदीगडमधील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेचा तपास करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian army, Ladakh, Road accident