मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

क्रूरतेचा कळस! 12 वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून केलं संतापजनक कृत्य

क्रूरतेचा कळस! 12 वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून केलं संतापजनक कृत्य

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला होता; मात्र रात्र उलटून गेली तरी तो घरी परतला नाहीत. मुलाचे आई-वडील काम करत असलेल्या शेताजवळच बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला होता; मात्र रात्र उलटून गेली तरी तो घरी परतला नाहीत. मुलाचे आई-वडील काम करत असलेल्या शेताजवळच बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला होता; मात्र रात्र उलटून गेली तरी तो घरी परतला नाहीत. मुलाचे आई-वडील काम करत असलेल्या शेताजवळच बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Gujarat, India

अहमदाबाद 08 डिसेंबर : देशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं खुनाचं सत्र थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. अंगावर शहारे आणणाऱ्या खुनाच्या घटना दररोज कुठे ना कुठे घडत आहेत. अशाच एका घटनेने गुजरातमधला जामनगर जिल्हा हादरला आहे. जामनगर जिल्ह्याच्या जामनगर तालुक्यातल्या एका गावात बुधवारी (7 डिसेंबर) सकाळी एका 12 वर्षांच्या मुलाचा खून झाल्याचं आढळलं आहे. या घटनेमध्ये मुलाचे प्रायव्हेट पार्ट कापल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. पंकज दामोर असं खून झालेल्या अल्पवयीनं मुलाचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज हा मूळचा मध्य प्रदेशातल्या अलीराजपूर जिल्ह्यातला एका गावचा रहिवासी होता. त्याचे आई-वडील गेल्या सहा वर्षांपासून जामनगर जिल्ह्यातल्या बेराजा गावात शेतमजूर म्हणून काम करतात. पंकज त्यांच्यासोबत वास्तव्याला होता. तो मंगळवारी (6 डिसेंबर) सायंकाळपासून बेपत्ता होता. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला होता; मात्र रात्र उलटून गेली तरी तो घरी परतला नाहीत. मुलाचे आई-वडील काम करत असलेल्या शेताजवळच बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.

वर्धा : गर्लफ्रेंड तिच्या मित्रासोबत नाचली, प्रियकराने रागाच्या भरात तरुणाला चाकूने केले जखमी

जामनगर जिल्ह्यातल्या पंचकोशी विभागीय पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वैयक्तिक वैमनस्यातून मुलाची हत्या झाली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे इन्स्पेक्टर आर. के. करमटा म्हणाले, "मुलाच्या शरीरावरच्या जखमा पाहता असं दिसतं, की ऊस तोडण्यासाठी वापरल्या जात असलेल्या बिल हुकचा वापर या प्रकरणात हत्यार म्हणून करण्यात आला आहे. मुलाच्या डोक्यावर या शस्त्रानं केलेल्या दोन जखमा दिसत आहेत. त्याचा प्रायव्हेट पार्टही कापण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतरच अधिक माहिती समजेल."

Bhandara Crime News : भयंकर! 8 वर्षाच्या मुलीवर निर्घृण अत्याचार करून जाळलं; आरोपीही अल्पवयीन

पोलिसांना तपासात मदत करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं. या पथकाने घटनास्थळाची बारकाईने तपासणी केली असून, तपासासाठी आवश्यक ते नमुने गोळा केले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर खुनाच्या घटनेबाबत चित्र अधिक स्पष्ट होईल.

दरम्यान, जामनगर जिल्ह्यात शेती व्यवसायाची चांगली भरभराट झालेली आहे; मात्र स्थानिक मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे या भागात बाहेरच्या राज्यांतले अनेक मजूर शेतीची कामं करण्यासाठी स्थलांतरित झालेले दिसतात. खून झालेल्या मुलाचं कुटुंबही याच गटामध्ये मोडणारं आहे.

First published:

Tags: Crime news, Murder