नाशिक,27 ऑगस्ट: सध्याच्या कोरोनामुळे (Corona Virus) शेतमालाला अत्यल्प भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कित्येक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर (Tomato Prices) फेकून दिला आहे. गुरुवारी नाशिकच्या बाजार समितीत अवघड दोन ते तीन रुपये किलो या दराने टोमॅटो विकला जात होता. नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी (Nashik Farmers) क्रेट्सनं भरलेले टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहे. टोमॅटोला घाऊक बाजारात दोन ते तीन रुपयांनी घसरले. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
#WATCH Nashik farmers threw crates of tomatoes on the road yesterday after prices crashed to Rs 2-3 per kg in the wholesale market#Maharashtra pic.twitter.com/SBMqgSGfFH
— ANI (@ANI) August 27, 2021
राज्याचे कृषिमंत्री असलेल्या दादा भुसे यांच्या जिल्ह्यातच टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
आज #नाशिक_दौऱ्यावर असताना नाशिक बाजार समितीमधील #टोमॅटो_मार्केटला भेट दिली.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) August 26, 2021
राज्यात अचानकपणे टोमॅटोचे भाव कोसळल्याने #शेतकरी हवालदिल झाले आहेत. आज #कोरोनाच्या कठीण काळातही मोठे कष्ट आणि खर्च करून पिकविलेला माल भाव नसल्याने रस्त्यावर ओतण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
1/3 pic.twitter.com/bF8CfS6WGN
नाराज शेतकऱ्यांची शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान सरकारकडून किमान भाव आणि अनुदान मिळावं अशी मागणी करणार असल्याचं त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.