विष्णु शर्मा(जयपूर), 22 मार्च : राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये एक धक्कादायक घडली आहे. मुलीने एका तरूणाशी आंतरजातीय विवाह केल्याने भावाने रागाच्या भरात भयानक कृत्य केले आहे. मित्रांच्या साथीने बहीण आणि भाऊजींचे अपहरण केले होते. याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल होताच तत्काळ कारवाई करत अवघ्या 12 तासांत दोघांची सुटका करून आरोपींना अटक केली. याबाबत ज्यांनी अपहरण केले पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे. ही घटना राजस्थानच्या जयपूरमधील हरमदा पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे.
जयपूरच्या डीसीपी वंदिता राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामगढ येथील रहिवासी रामजीलाल यांनी 20 मार्च रोजी त्यांचा मुलगा पृथ्वीराज आणि सून पूजा यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा पृथ्वीराजने उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये 10 मार्च रोजी पूजासोबत प्रेमविवाह केला होता. यामुळे पूजाचे कुटुंब संतप्त झाले होते.
संपकाळात आरोग्यसेवा बिघडली, नागपुरात मेयो-मेडिकलमध्ये 6 दिवसात 109 मृत्यू
पाच दिवसांनी पृथ्वीराज आणि पूजा दोघेही जयपूरला आले आणि हरमडा येथील मेहता शाळेजवळ भाड्याने राहू लागले. त्यानंतर 19 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पूजाचा भाऊ कजोडमल योगी त्याच्या 10-15 साथीदारांसह त्यांच्या भाड्याच्या घरात पोहोचला. त्याने पूजा आणि पृथ्वीराज यांना तेथून जबरदस्तीने उचलून नेले.
त्यानंतर दोघांनाही वाहनात टाकून दौसाकडे नेले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या शोधात अनेक ठिकाणी छापे टाकले. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत अवघ्या 12 तासांत आरोपीला दौसा येथून पकडले आणि पूजा आणि पृथ्वीराज यांची सुटका केली.
गुजरातमधील भयंकर घटना, चोर समजून 2 परप्रांतीय मजुरांची जमावाने केली हत्या
पोलिसांनी आरोपींच्या साथीदारांना पकडून कसून चौकशी केली असता घटनेचा उलगडा केला. त्यामुळे पोलिसांचे काम सोपे झाले आणि ते आरोपींपर्यंत पोहोचले. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत असून या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे मुलगा आणि सून सुखरूप परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Jaipur, Local18, Rajstan