नागपूर, 21 मार्च : गेल्या आठवड्यात जु्न्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. अखेर सहा दिवसांनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. पण संपकाळात नागपूरमध्ये आरोग्य सेवेला मोठा फटका बसला. या सहा दिवसात मेडिकलमध्ये ८२ तर मेयोमध्ये २७ रुग्णांचा मृत्यू झाला. मेयो मेडिकलमधील १३०० परिचारिका अन् लिपिक, चतुर्थ श्रेणी कामगार संपावर गेले होते.
मेडिकल आणि मेयोत बाह्यरुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली. याशिवाय प्रसूतीसाठी आलेल्या महिलांनाही खासगी रुग्णालयात जावं लागलं. कर्मचारी संपावर असल्यानं रुग्णांना देण्यात येणाऱ्या इतर सुविधाही मिळत नव्हत्या. दरम्यानच्या काळात कंत्राटी परिचारिका बोलावण्यात आल्या होत्या. तर परिचारिकांचे काम एमबीबीएस डॉक्टरांनी करत रुग्णसेवा केली.
गोंदिया हादरलं! कृषी महाविद्यालय आवारात खून करून मृतदेह झाडाला लटकवला
संपकाळात मेडिकलमध्ये ८२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर १२ महिलांची प्रसूती झाली. मेयोमध्ये २७ रुग्ण दगावले. तर १० महिलांची प्रसूती झाली. मेडिकलमध्ये १७ मार्चरोजी सर्वाधिक २३ तर मेयोत १९ मार्च रोजी ११ रुग्णांचा मृत्यू झाला.
मेयो आणि मेडिकलमधील रुग्णसेवेवर परिणाम होत असल्यानं निवासी डॉक्टरांच्या मॉर्ड संघटनेकडून मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून संप मागे घेण्याबाबत निवेदन देण्यात आलं होतं. संपावर गेलेले कर्मचारी मंगळवारपासून कामावर रुजू होणार असल्याची माहिती विविध संघटनांकडून देण्यात आली आहे. सध्या संपकाळात जे ड्युटीवर नव्हते त्यांच्या वेतनातून कपात करावी अशी मागणीही केली जातेय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.