अहमदाबाद, 22 मार्च : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. मागच्या काही काळापासून गुजरातमध्ये गुन्हेगारी वाढल्याने चिंतेचा विषय बनत चालला आहे. दरम्यान परप्रांतीय मजुरांना चोर समजून बेदम मारहाण करण्याच्या दोन घटना गुजरातमध्ये समोर आल्या आहेत. यातील एक घटना अहमदाबाद आणि दुसरी खेडा जिल्ह्यात घडली आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन्ही घटनांमध्ये पीडितांना आपला जीव गमवावा लागला आहे.
नेपाळहून पोट भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीला जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमधील सनाथल चौक परिसरात ही घडना घडली. अहमदाबादच्या जीवनपुरा गावात एका नेपाळी तरुणाला चोर समजून गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. नंतर त्याचा मृतदेह कालव्याजवळ फेकून दिला. रात्री उशिरा हा तरुण जीवनपुरा गावातून जात असताना भटक्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. कुत्र्यांपासून वाचण्यासाठी तो घरात जाऊन लपला. त्यामुळे गावकऱ्यांनी त्याला चोर समजले जबर मारहाण केली.
संपकाळात आरोग्यसेवा बिघडली, नागपुरात मेयो-मेडिकलमध्ये 6 दिवसात 109 मृत्यू
ज्या घरात हा तरून भितीने थांबला त्या ठिकाणच्या लोकांनी तरुणाची विचारपूस केली. मात्र त्याला गुजराती भाषा येत नसल्याने तो तरुण त्याच्याच भाषेत बोलू लागला. घरातील लोकांनी तरुणाला चोर समजून गावकऱ्यांना बोलवून मारहाण करण्यास सुरुवात केली होती.
गावातील लोकांनी त्या तरुणाला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला. त्यानंतर गावातील लोक त्या तरुणाला रिक्षात बसवून रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला. दरम्यान तरुणाचा मृत्यूने जे रिक्षातून जात होते त्यांनी भितीने मृतदेह तदेह फेकून दिला. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे पोलीस पुढील तपास करत आहेत.
गुजरातमध्ये दुसऱ्या घटनेने खळबळ
अशीच एक घटना खेडा जिल्ह्यातून समोर आली आहे. मेहमदवाड तालुक्यातील सुधा वनसोल गावात (दि.21) छत्तीसगड येथील एका तरुणाला गावकऱ्यांनी चोर समजून बेदम मारहाण केली. या मारहाण झाल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण घटनेचा तपास केला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुधा वनसोल हा कामानिमीत्त गुजरातमध्ये आला होता. दरम्यान त्याची वाट चुकल्याने तो एका गावात पोहोचला होता. गावकऱ्यांनी आधी तरुणाची चौकशी केली. हा तरुण काय बोलत होता हे गावकऱ्यांना समजू शकले नाही. यामुळे हा तरुण चोरीच्या उद्देशाने गावात आल्याचे ग्रामस्थांना वाटले व त्यांनी तरुणावर हल्ला केला.
गावकऱ्यांनी तरुणाला चोर समजून बेदम मारहाण केली. तो बेशुद्ध पडला आणि त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. दरम्यान, मेहमदाबाद पोलिसांना माहिती मिळताच पोलीस रात्री गावात पोहोचले आणि पोलिसांनी चौकशी करून जखमी तरुणाला दाखल केले. त्यानंतर काही वेळाने तरुणाचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmedabad, Crime news, Gujarat, Local18