• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • मोठा भाऊ घरी नसताना दिराने वहिनीचा गळा चिरला; पोलीस ठाण्यात झाला दाखल

मोठा भाऊ घरी नसताना दिराने वहिनीचा गळा चिरला; पोलीस ठाण्यात झाला दाखल

तपासादरम्यान एका खोलीत महिलेचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली असून दीराची चौकशीही सुरू आहे.

 • Share this:
  जबलपुर, 25 नोव्हेंबर : मध्य प्रदेशातील (Madhya pradesh News) जबलपूरमध्ये चार वर्षांनी मोठ्या वहिणीची एका दिराने अत्यंत क्रूरपणे हत्या (Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे. वहिनीचा गळा चिरल्यानंतर दीराने पोलिसांकडे जाऊन आत्मसमर्पण केलं. तेथील पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. दीराला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. तपासादरम्यान एका खोलीत महिलेचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली असून दीराची चौकशीही सुरू आहे. काय आहे प्रकरणं? हनुमानताल पोलीस ठाण्याचे प्रभारी गोल्हानी यांनी सांगितलं की, राजा चक्रवर्ती या 28 वर्षीय तरुणाने आपली वहिणी रोशनी चक्रवर्ती (32) हिची हत्या केली. हत्येचं कारण विचारलं असता त्याने वहिनीवर संशय व्यक्त केला. वहिनीचे बाहेर प्रेमप्रकरण सुरू असल्याचा दीराला संशय होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. रोशनीचा पती प्रदीप चक्रवर्ती पेंट-पुट्टीचं काम करतो. दोघांना 13 वर्षांचा मुलगा आणि 11 वर्षांची मुलगीदेखील आहे. गुरुवारी सकाळी प्रदीप कामावर निघून गेला. दोन्ही मुलं शाळेत गेले होते. दुपारी एक वाजता प्रदीपचे वजील सुरेश चक्रवर्ती पालिकेच्या कार्यालयात गेले होते. काही वेळानंतर रोशनीदेखील निघून गेली आणि दुपारी 3.30 वाजता घरी परतली. परतल्यानंतर ती आपल्या खोलीत जमिनीवर गादी टाकून आराम करीत होती. त्याचवेळी दुसऱ्या खोलीत टीव्ही पाहणारा दीर राजा तिच्या चरित्र्यावर संशय घेऊ लागला आणि तिची चौकशी करू लागला. हे ही वाचा-Shocking!वडिलांनी मुलीला प्रेमाने सांगितलं शाळेत नको जाऊस, तिने असं काही केलं की रोशनीवर त्याने विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही केला. मोठा भाऊ प्रदीप घरी आल्यानंतर रोशनीविषयी सर्व सांगणार असल्याची धमकीही त्याने दिली. यानंतर दोघांमधील वाद पेटला. यानंतर राजाने घरात ठेवलेल्या सुऱ्याने रोशनीचा गळा चिरला. ज्यामुळे रोशनीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वहिनीची हत्या केल्यानंतर राजाने रक्ताने माखलेले कपडे बदलले आणि सुरा, कपडे घरात लपवले. यानंतर तो पोलीस ठाण्यात गेला. घटनास्थळावरील चौकशी करीत असताना त्यांना राजाचे रक्ताने माखलेले कपडे आणि सुरा सापडला.
  Published by:Meenal Gangurde
  First published: