खगडिया, 25 नोव्हेंबर : कधी-कधी आई-वडिलांनी सांगितलेली एक छोटीशी बाबदेखील मुलांसाठी त्रासदायक ठरते. अशीच एक घटना बिहारमधील (Bihar News) खगडिया या भागातून समोर आली आहे. येथे एका वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाने विनंती करीत म्हटलं की, बाळा, आज शाळेत जाऊ नकोस, नाहीतर तुझ्याशिवाय घर रिकामं होईल. मात्र मुलीला ही बाब इतकी जिव्हारी लागली की, तिने गळफास घेऊ आत्महत्या (Suicide News) केली.
ही घटना खगडिया जिल्ह्यातील सिराजपूर गावातील आहे. येथे बुधवारी दुपारी शाळेच्या शिक्षिक सुमन चौधरी यांची 12 वर्षांची मुलगी राधा राणी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सांगितलं जात आहे की, सुमन चौधरीची पत्नी भागलपूर येथे खरेदी करण्यासाठी गेली होती. या दरम्यान त्यांनी आपली मुलगी राधा राणीला सांगितलं की, तू शाळेत जाशील, मी भागलपूरच्या बाजारात जात आहे. (Shocking The father lovingly told the daughter not to go to school she suicide)
तू शाळेत जाऊ नको घर रिकामं होईल...
आईचं म्हणणं ऐकून मुलीने शाळेत जाण्याची तयारी सुरू केली. यादरम्यान मुलीचे वडिल आले आणि ते राधा राणीला म्हणाले की, शाळेत जाऊ नकोस, नाहीतर घर रिकामं होईल. वडिलांचे हे शब्द मुलीला आवडले नाही आणि वडील शाळेत जाताच मुलीले आपल्या खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.
हे ही वाचा-पाण्याच्या ड्रममध्ये कोंबला तरुणाचा मृतदेह; दुर्गंधी पसरल्याने भयावह प्रकार उघड
मुलीला त्या अवस्थेत पाहून वडिलांना बसला धक्का..
सुमन चौधरी यांचे शेजारी काही कामासाठी त्यांच्या घरात आले तेव्हा त्यांनी मुलीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. यानंतर त्यांनी तातडीने मुलीच्या वडिलांना याबद्दल माहिती दिली. वडील शाळेतून धावतच घरी पोहोचले. यानंतर शेजारच्यांच्या मदतीने मुलीला खाली उतरवलं आणि पोलिसांना याबाबत सूचना दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मुलीच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट होईल. कारण ही आत्महत्येऐवजी हत्यादेखील असू शकते. याशिवाय इतक्या छोट्याशा कारणावरुन कोणतीही मुलगी गळफास लावून आत्महत्या कशी करेल याबद्दलही सवाल उपस्थित केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Crime news, Suicide