अहमदाबाद 20 जानेवारी : वडोदरा येथील कारेलीबाग परिसरात एक नवजात मुलगी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेली आढळून आली. पोलिसांच्या एसएचई पथकाने नवजात बाळाला उचलून रुग्णालयात दाखल केलं. बाळाची प्रकृती ठीक असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचं सांगण्यात येत आहे. पण या कथेत ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा काही वेळातच एक तरुण आपल्यासोबत एका युवतीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आला. तपासादरम्यान डॉक्टरांना त्याच्यावर संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. 6 महिन्यांपूर्वी जोडप्याचा झालेला भयावह शेवट; आता घरच्यांनी दोघांचे पुतळे बनवून लावलं लग्न घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी या दोघांचीही चौकशी केली, त्यानंतर दोघांनी संपूर्ण सत्य पोलिसांना सांगितलं. दोघांनीही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत असल्याचं पोलिसांना सांगितलं. यादरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले आणि मुलगी गरोदर राहिली. बदनामीच्या भीतीने त्यांनी ही बाब कुटुंबीयांपासून लपवून ठेवली होती. तरुणाने पोलिसांना सांगितलं की, लग्नाच्या दोन दिवस आधी मुलीच्या पोटात दुखत होतं आणि तो आपल्या होणाऱ्या पत्नीला ऑटोमधून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता. मात्र ऑटोमध्येच तिने बाळाचा जन्म दिला. त्यामुळे तो चांगलाच घाबरला आणि त्यांनी बाळाला निर्जन ठिकाणी सोडून पळ काढला. 16 वर्षाच्या विद्यार्थ्यावर शिक्षिकेचं जडलं प्रेम; दोघांनी उचललं असं पाऊल की पालकही हैराण प्रसूतीनंतर तरुणीची प्रकृती बिघडली आणि उपचारासाठी हे दोघंही त्याचं रुग्णालयात पोहोचले, जिथे पोलिसांनी त्यांच्या बाळाला दाखल केलं होतं. बाळा अशा प्रकारे सोडल्यानंतर आपल्याला पश्चाताप झाला होता, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. तसंच हे बाळ आपल्यासोबत नेण्याची इच्छा असल्याचंही हे जोडपं म्हणालं. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आईची डीएनए चाचणी झाल्यानंतर मुलाला पालकांच्या ताब्यात दिलं जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.