जयपूर 09 मे : प्रेम हे अतिशय सुंदर आणि खास आहे, असं म्हटलं जातं. पण काहीवेळा हेच प्रेम अतिशय भयानक रूप घेतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. राजस्थानच्या नागौरमध्ये एका तरुणाने प्रेयसीसोबत ब्रेकअप केल्यानंतर तिची हत्या केली. रविवारी दुपारी तरुणाने आपल्या मित्रासह मिळून तरुणीची हत्या केली. काही कारणास्तव दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून बडी खाटू पोलिसांनी आरोपी प्रियकराला 24 तासांत अटक केली. उंचाईडा गावातील रहिवासी देवेंद्र सिंग यांनी बडी खाटू पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, 7 मे रोजी त्यांचा लहान भाऊ विकास सिंग याने फोन करून त्यांची बहीण मनीषा कंवर रक्तबंबाळ अवस्थेत पडली असल्याची माहिती दिली. तरुणीने तरुणाला भररस्त्यात भोसकलं; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल फिर्यादीत अज्ञात व्यक्तींवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. स्टेशन ऑफिसर हरीश सांखला यांनी सांगितलं की, जिल्हा पोलीस अधीक्षक राममूर्ती जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आणि घटनास्थळावरून जाणाऱ्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, ज्यामध्ये दोन जण संशयास्पद आढळले. यानंतर प्रकाश लोहार नावाच्या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने मनीषा ही आपली मैत्रीण असल्याचं मान्य केलं. काही कारणाने त्यांची मैत्री तुटली होती आणि तो तिला खूप दिवसांपासून मनवण्याचा प्रयत्न करत होता. आरोपीने सांगितलं की, मनवण्याचा प्रयत्न करूनही जेव्हा तिने ऐकलं नाही, तेव्हा त्याने त्याच्या मित्रासोबत मिळून तिची हत्या करण्याचा कट रचला. मुलगी घरी एकटी असताना त्याने तिची लोखंडी रॉडने वार करून हत्या केली. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.