जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / तरुणीने तरुणाला भररस्त्यात भोसकलं; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

तरुणीने तरुणाला भररस्त्यात भोसकलं; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

तरुणाला भररस्त्यात भोसकलं

तरुणाला भररस्त्यात भोसकलं

जळगाव शहरातील अजिंठा चौकात भरदिवसा एका तरुणीने शिवीगाळ करत एका तरुणावर चाकू हल्ला केला.

  • -MIN READ Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 8 मे : जळगाव शहरातील अजिंठा चौकात एक धक्कादायक घटना घडली. भरदिवसा एका तरुणीने शिवीगाळ करत एका तरुणावर चाकू हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण? जळगाव शहरातील अजिंठा चौकात हॉटेल महिंद्राजवळ एका तरुण-तरुणीचा गोंधळ सुरु होता. याच वादात काही वेळाने तरुणीने छोटा चाकू काढला, आणि तरुणाला शिवीगाळ करत त्याच्या छातीवर वार केले, यात चाकू लागल्याने तरुणाच्या छातीतून रक्ताची धार लागली, तरीही तरुणी त्याच्यावर चाकूने वार करत होती. यादरम्यान तरुण हा तरुणीकडील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. या वादात तरुणाने त्याचे अंगावरील शर्ट फाडून टाकला. तरुण तरुणीला माझा मर्डर करुन टाक असे, आव्हान करत असल्याचे दिसून येत आहे. तरुणी त्याच्यावर चाकूने वार करत असल्याचे दिसून येत आहे. वाचा - शिवसेना आमदाराच्या मुलाचा ट्रॅक्टर चोरीला, पोलीस लागले कामाला! पोलिसात कुठलीही तक्रार नाही या प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. मात्र, आपसात वाद असेल, तसेच तरुणीचा संताप अन् तिच्या हातात चाकू बघून कुणाचीही हे भांडण सोडविण्याची हिंमत झाली नाही. तब्बल अर्धा ते पाऊण तास भररस्त्यावर हा गोंधळ सुरु होता. तरुण दारुच्या नशेत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान दोघांचीही नावे कळू शकलेली नाहीत. यादरम्यान तरुणी संबंधित तरुणाबद्दल व्हिडीओमध्ये सांगत आहे, यात संबंधित जखमी तरुणही दिसून येत आहे. यात ती तरुणी स्वत: बोलत आहे. सदरच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडीयाच्या एका साईटवर अपलोड झाला, ज्या खात्यावर हा व्हिडीओ अपलोड झाला, ते खाते एका महिलेचे आहे. त्यावरुन व्हिडीओ डाऊनलोड करण्यात येवून काही वेळातच हा व्हिडीओ व्हाटस्अप व्हायरल झाला. काही वेळाने मूळ साईटवरुन हा व्हिडीओ डिलीट झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेप्रकरणी काल उशीरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद नसल्याचेही समोर आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , jalgaon
  • First Published :
जाहिरात
जाहिरात