'या' हसऱ्या फोटोमागे आहे अतिशय वाईट बातमी, वाचून फुटेल अश्रूंचा बांध

'या' हसऱ्या फोटोमागे आहे अतिशय वाईट बातमी, वाचून फुटेल अश्रूंचा बांध

आनंदाला सुरुंग लागणारी एक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. साखरपुड्याच्या अवघ्या 3 दिवसांआधी नवरदेवाने आत्महत्या केली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 17 मार्च : लग्न म्हटलं की घरात उत्सवाचं वातावरण असतं. पण याच उत्सवाला आणि आनंदाला सुरुंग लागणारी एक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. साखरपुड्याच्या अवघ्या 3 दिवसांआधी नवरदेवाने आत्महत्या केली आहे. नवरदेव तरुण हा इंजिनिअर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातील सदस्य मुलाच्या साखरपुड्याच्या खरेदीत मग्न होते. सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. साखरपुढा तीन दिवसांवर आला असतानाच 24 वर्षीय इंजिनियर तरुणानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी चित्तेंपिंपळ गाव इथं समोर आली आहे. या घटनेमुळे घरातील आनंदाचं वातावरण क्षणातच दुःखात बदललं. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शुभम बबनराव खोसे असं आत्महत्या करणाऱ्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मृत शुभमचं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं. तो वीज वितरण कंपनीचं कंत्राट घेत असे. गावातील राहत्या घराच्या तळ मजल्यावर त्याचं कार्यालय होतं. तेथूनच तो सर्व कामं करायचा. काही दिवसांपूर्वीच त्याची नात्यातल्या मुलीसोबत सोयरीक जमली होती. येत्या 20 मार्च रोजी शुभंमचा साखरपुडा होणार होता. त्यासाठी मागील चार ते पाच दिवसापासून घरच्यांची खरेदी सुरू होती.

काल संध्याकाळी साखरपुड्याची अंगठी व इतर दागिने खरेदी केले. शुभमचा साखरपुडा असल्यानं घरात सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. रात्री त्यानं घरच्यांसोबत जेवण केलं व त्याच्या खोलीत झोपायला चाललो असं म्हणत तो खोलीत गेला. आज सकाळी बराच वेळ झाला तरीदेखील तो झोपेतून उठला न्हवता. रोज सकाळीच उठणारा मुलगा आज का उठला नाही म्हणून घरच्यांनी आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.

बऱ्याच वेळानंतर खिडकीच्या फटीतून डोकावून पाहिलं असता शुभमने कापज्यानं पंख्याला गळफास घेतल्याचं दिसलं. नातेवाईकांनी दरवाजा तोडत तातडीनं त्याला फसावरून खाली उतरवलं आणि रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी तपासून शुभमला मयत घोषित केलं.

काही दिवसावरच लग्न आलेलं असताना नवीन आयुष्याची सुरुवात होण्यापूर्वीच शुभमनं आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेमुळं परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास चिकलठाणा पोलीस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2020 02:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading