6 दिवसांच्या लेकीला 10 रुपयांत विकलं, वाचा आईवर अशी कोणती परिस्थिती ओढवली?

6 दिवसांच्या लेकीला 10 रुपयांत विकलं, वाचा आईवर अशी कोणती परिस्थिती ओढवली?

आईने आपल्या 6 दिवसांच्याा नवजात मुलीला अवघ्या 10 रुपयांसाठी शेजाऱ्याला विकलं आहे. ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा आई शेजाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेली.

  • Share this:

मुरादाबाद, 17 मार्च : सगळ्यात सुंदर जर कोणतं नातं असेल तर ते आई आणि लेकराचं असतं. पण या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या 6 दिवसांच्याा नवजात मुलीला अवघ्या 10 रुपयांसाठी शेजाऱ्याला विकलं आहे. ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा आई शेजाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

एका महिलेने आपल्या सहा दिवसांची नवजात मुलगी तिच्या शेजाऱ्याला दहा रुपयांना विकल्याचा आरोप आहे. शेजाऱ्ंयांवर गुन्हा नोंदवण्यासाठी महिला स्वत: एसएसपी कार्यालयात पोहोचली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. तिने अधिकाऱ्यांना सांगितलं की तिला आपली मुलगी परत पाहिजे आहे. पोलीस चौकशीत महिलेनं आपला गुन्हा कबूल केला आहे. या महिलेनं सांगितलं की दोन महिन्यांपूर्वी तिनं मुलगी एका शेजार्‍याला विकली होती. उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यातील काटघर भागात ही घटना घडली आहे.

वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी काठघर पोलीस स्टेशनच्या एसएचओला महिलेला ताब्यात घेऊन तिच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं की, या महिलेचं जवळपास तीन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. 4 जानेवारीला तिनं एका मुलीला जन्म दिला, त्यानंतर ती पतीपासून विभक्त झाली. ती तिच्या पालकांसमवेत राहत होती आणि तिचं बाळही ठीक नव्हतं, म्हणून महिलेनं नवजात बाळाला रेल्वे रुळावर फेकलं.

नवजात मुलाला तिच्या शेजारी रेखानं वाचवलं असलं तरी नंतर तिनं बाळ मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. अतिरिक्त एसपी दीपक भुकर म्हणाले, “रेखा मरणाच्या वाटेवर असताना मुलीला दत्तक घेतलं. तिच्या मुलीवर अत्याचार केल्याबद्दल आम्ही तिच्या आईविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय बालकल्याण समिती घेईल. "

खरंतर परिस्थिती माणसाला घडवते आणि बिघडवते. पण त्यावर पोटच्या बाळाला फेकून देणं हा कोणता न्याय असतो. आपल्या देशात महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये सुरक्षित नाही. त्यात जर मुलगी झाली म्हणून तिला फेकून दिलं तर भविष्यात स्त्रीयांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेटी बचाओ बेटी पढाओ अशी जर फक्त जनजागृती झाली तर त्यातून काही निष्पन्न होणार नाही.

First published: March 17, 2020, 4:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading