जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Shocking! भाजप नेत्याने पत्नीवर गोळी झाडून केली आत्महत्या; कमरेवर होता काडतुसांचा बेल्ट

Shocking! भाजप नेत्याने पत्नीवर गोळी झाडून केली आत्महत्या; कमरेवर होता काडतुसांचा बेल्ट

Shocking! भाजप नेत्याने पत्नीवर गोळी झाडून केली आत्महत्या; कमरेवर होता काडतुसांचा बेल्ट

आज सायंकाळी हा प्रकार घडला, यानंतर तातडीने पोलिसांनी त्यांना रुग्णालयात हलवलं. मात्र त्यांचा ऑन द स्पॉट मृत्यू झाला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंगेर, 16 जून :  एका भाजप नेत्याने (BJP Leader Killed his wife) आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत: ही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. बिहारच्या (Bihar News) मुंगेरमधील भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री अरुण यादव यांनी आधी पत्नीला (Crime News) गोळी मारली, आणि नंतर स्वत:ला गोळी मारून आत्महत्या (BJP leader suicide) केली. या घटनेचा दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणात तपास करीत असून दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. खोलीतून कारतुसांचा बेल्ट सापडला… लाल दरवाजा येथे राहणारे अरूण यादव उर्फ बडा बाबू याने देशी कट्ट्याने आधी पत्नी प्रीती कुमारी हिची हत्या केली. नंतर याच बंदुकीने स्वत:वर गोळी झाडली. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. अरूण यादव भाजप ओबीसी मोर्चा जिल्ह्याचे महामंत्री होते. तर पत्नी यंदा मुंगेर नगर निगमच्या मेअर पदासाठी संभाव्य उमेदवार होती. ही घटना गुरुवारी सायंकाळी 6 वाजता घरातच घडली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी खोलीत दार तोडलं. यानंतर त्यांनी दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे. दाम्पत्याच्या मृत्यूचं वृत्त ऐकताच मोठ्या संख्येने लोक रुग्णालयात पोहोचले. एसडीपीओ नंदजी प्रसाददेखील रुग्णालयात पोहोचले.

पत्नीसोबतचं भांडण ठरलं कारण… अरूण यादव तीन भावांमध्ये सर्वात मोठे होते. काही वर्षांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. लाल दरवाजा स्थित खोलीत अरूण यादव पत्नीसोबत राहत होते. दोन्ही भाऊ जवळच्या घरांमध्येच राहत होते. स्थानिकांनी या घटनेमागे पत्नीसोबतच वाद कारण असल्याचं सांगितलं. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहे. अरुण यादव शेतातून फेरफटका मारून सायंकाळी 5 वाजता घरी पोहोचले. आल्यानंतर त्यांनी घोड्यांना चारा दिला. चारा दिल्यानंतर खोलीत निघून गेले. काही वेळानंतर स्थानिकांनी खोलीतून दोन गोळ्यांचा आवाज ऐकला. गोळी लागल्यानंतर पत्नी खोलीत जमिनीवर पडली होती. तर अरूण यादव खाटेवर मृतावस्थेत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP , suicide
  • First Published :
जाहिरात
जाहिरात