Home /News /maharashtra /

प्रेयसी मागितली सोन्याची अंगठी, प्रियकराने गळा आवळला आणि मृतदेह फेकला नदीत!

प्रेयसी मागितली सोन्याची अंगठी, प्रियकराने गळा आवळला आणि मृतदेह फेकला नदीत!

ओढणीने गळा आवळून खून केला आणि मृतदेह कडेगाव येथील भिवडी खुर्द गावाच्या हद्दीत येरळा नदी पात्रात फेकून दिला होता.

सांगली, 15 जून : प्रेयसी आपल्या प्रियकराने हट्टाने काही ना काही मागत असते आणि प्रेयसीला ते आणून देण्यासाठी प्रियकर जीवाची आटापिटा करतो. पण, सोन्याची अंगठी मागितली म्हणून एका प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून खून (murder) केल्याची धक्कादायक घटना सांगली (sangali) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी कडेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  ताई सचिन निकम (वय 32) असं मृत महिलेचं नाव आहे. तर प्रियकर राहुल सर्जेराव पवार (वय ३१ वर्षे) असं आरोपीचं नाव आहे. राहुल पवार याने  ओढणीने गळा आवळून खून केला आणि मृतदेह कडेगाव येथील भिवडी खुर्द गावाच्या हद्दीत येरळा नदी पात्रात फेकून दिला होता. 6 जून भिकवडी खुर्द गावाचे हद्दीत येरळा नदी पात्रात पुलाजवळ एक मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर याबद्दल  पोलिसांना माहिती देण्यात आली.  पोलिसांनी त्या ठिकाणी जावून खात्री केली असता त्या ठिकाणी एक स्त्री जातीचे प्रेत वय अंदाजे २५ ते ३० वर्ष असल्याचे स्पष्ट झाले. महिलेचा मृतदेह पूर्णपणे सडलेला असल्यामुळे पोस्टमार्टम जागीच केले. कडेगाव पोलिसांनी विटा पोलीस स्टेशनमध्ये 2022 चे मिसिंग रजिस्टरची पाहणी करुन बेवारस मयताचे वर्णनाचे मिळते जुळते वर्णनाचे मिसिंगबाबत माहिती घेतली. तेव्हा बेपत्ता ताई सचिन निकम ही खानापूर येथील बलवडी येथील असल्याचे स्पष्ट झाले. तर नोतवाईक यांनी प्रेताचे अंगावरील कपडे आणि पैंजन ओळखले. त्यानंतर सदर मयेतचा पती आणि नातेवाईकाकडे चौकशी करुन अधिक माहिती घेतली असता मयत ताई निकम ही भाडयाने  विटा येथे राहत होती. तिथे ती एका हॉटेलमध्ये काम करत होती. (पुण्यासाठी क्रिकेट इतिहासातली सगळ्यात मोठी गूड न्यूज, दोघांची टीम इंडियात निवड!) पोलिसांनी अधिक तपास केला असता, विटा येथील रेणुका ज्वेलर्स मालक राहुल पवार याचे मयत ताई सचिन निकम हिच्याशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. पोलिसांनी फोन रेकॉर्ड तपासले असता ताई निकम आणि राहुल पवार यांचे एकमेकांना भरपुर कॉल झालेचे दिसून आले. यावरुन राहुल पवार  याला पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. (जेनेलियांनी सासरे विलासराव देशमुख यांच्यासोबतची शेअर केली खास आठवण, कॅप्शननं वेधलं लक्ष) त्याने सुमारे दीड वर्षांपासून ताई  निकम हिच्याशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. तिने 3 जून रोजी दुकानात वाढदिवासाकरीता एक ग्रॅम सोन्याची अंगठी मागितली. ती न दिल्याच्या कारणावरुन तिने प्रेम संबंधाबाबत त्यांच्या वडिलांना सांगेन असा दम दिला. 5 जूनला संतोष पवार याने तिला घेऊन कडेगाव, हद्दीत रस्त्याकडेला चार चाकी गाडी थांबवून ताई  निकम हिचा गळ्यातील ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गाडीतून भिकवडी खुर्द गावाच्या हद्दीत येरळा नदीपात्रात फेकून दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा  गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या