मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Mob Lynching: छापेमारीसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जमावानं चिरडलं; गळा आवळून हत्या

Mob Lynching: छापेमारीसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जमावानं चिरडलं; गळा आवळून हत्या

Mob lynching Case: दरोडा आणि लूटमारीच्या प्रकरणात छापेमारी करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला संतप्त जमावाने चिरडल्याची (Police officer mob lynching) घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

पाटणा, 10 एप्रिल: दरोडा आणि लूटमारीच्या प्रकरणात छापेमारी करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला संतप्त जमावाने चिरडल्याची (Police officer mob lynching) घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी अचानक केलेल्या हल्ल्यात छापेमारी (Police Raid) करण्यासाठी आलेल्या पथकानं घटनास्थळावरून पळ काढला. मात्र एका पोलीस अधिकाऱ्याला आरोपींनी पकडलं. त्यानंतर आरोपींनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर सर्व राग काढला असून त्यांना बेदम मारहाण केली आहे. या दुर्दैवी घटनेत संबंधित पोलीस अधिकाऱ्याचा जागीच जीव गेला आहे. या घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

संबंधित मृत पोलीस अधिकाऱ्याचं नाव अश्विनी कुमार (Ashwini Kumar) असून ते बिहारमधील किशनगंज नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आहेत. एका लुटमारीच्या प्रकरणात छापेमारी करण्यासाठी ते बंगालमध्ये गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलिसांचं एक विशेष पथकही होतं. दरम्यान हिंसक जमावाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली आहे. या प्रकeरानंतर पोलीस विभागात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेबाबत बोलताना डीजीपी एस के सिंघल म्हणाले की, पश्चिम बंगालच्या डीजीपीशी बातचित करण्यात आली आहे. त्यांनी घडलेल्या प्रकरणाबाबत दुःख व्यक्त केलं असून शहिद पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

(हे वाचा-15 लाखांची लाच घेणाऱ्या आयकर विभागाच्या 2 अधिकाऱ्यांना अटक, मुंबईत CBIची कारवाई)

मृत पोलीस ठाणेदार अश्विनी कुमार एका लुटमारीच्या प्रकरणाचा तपास करत होते. यावेळी बिहारमध्ये घडलेल्या या गुन्ह्याचे धागेदोरे परराज्याशी जुडलेले आढळले. त्यामुळे अश्विनी कुमार आपल्या काही कर्मचाऱ्यांसोबत छापेमारी करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये गेले होते. यावेळी पश्चिम बंगालच्या दिनाजपूर जिल्ह्यातील पांजीपाडा पोलीस हद्दीतील पनतापाडा गावात छापेमारी सुरू केली होती. दरम्यान अपराध्यांना वाचवण्यासाठी गावातील जमावानं पोलिसांच्या पथकावर हल्ला केला.

(हे वाचा-15 लाखांची लाच घेणाऱ्या आयकर विभागाच्या 2 अधिकाऱ्यांना अटक, मुंबईत CBIची कारवाई)

ही घटना शनिवारी पहाटे चार वाजता घडली आहे. परिसरात अजून अंधार असल्यानं ठाणेदार अश्विनी कुमार हल्लेखोरांच्या तावडीत सापडले. यावेळी संतप्त जमावाने अश्विनी कुमार यांच्यावर हल्ला चढवत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान हल्लेखोरांनी त्यांचा गळा आवळल्याचीही माहिती समोर आली आहे. यावेळी बिहार पोलिसांनी पश्चिम बंगाल पोलिसांकडे मदत मागितली, मात्र त्यांनीही मदत केली नाही. शहिद पोलीस अधिकारी अश्विनी कुमार यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Attack on police, Crime news, Murder