मुंबई, 9 एप्रिल: सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (Central Bureau of Investigation) म्हणजेच सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत (Mumbai) मोठी कारवाई करत 15 लाखांची लाच स्वीकारणाऱ्या दोघांना अटक केली आहे. आयकर विभागात कार्यरत असलेल्या दोन निरीक्षकांना सीबीआयच्या टीमने 15 लाखांची लाच स्वीकारताना अटक (CBI arrest Income Tax inspectors accepting 15 lakh bribe) केली आहे. हे दोन्ही अधिकारी मुंबईतील बलार्ड पियर (Balard pier, Mumbai) येथील आयकर विभागात (Income Tax Office) कार्यरत होते. सीबीआयने आयकर विभागातील तीन निरीक्षकांच्या विरोधात लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे तिन्ही आरोपी बलार्ड पियर, मुंबई येथील आयकर विभागात कार्यरत आहेत. आयकर विभागामार्फत करण्यात येत असलेल्या चौकशीत तक्रारदारास मदत करण्यासाठी या तिघांनी 15 लाख रुपयांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे पण वाचा : धक्कादायक! भर मुंबईत चालू रिक्षात अत्याचाराचा प्रयत्न, स्वरक्षणासाठी धावत्या रिक्षातून उडी मारल्याने महिला जखमी ठरल्याप्रमाणे आयकर विभागातील अधिकारी हे लाच स्वीकारण्यासाठी तयार होते. तर दुसरीकडे सीबीआयने आपला सापळा रचून या आरोपींना रंगहाथ पकडण्याची तयारी पूर्ण केली होती. 10 लाख रुपयांची लाच स्वीकारताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सीबीआयने रंगेहाथ पकडले. तर 5 लाख रुपये रोख तक्रारदाराकडून जप्त करण्यात आले आहेत. सीबीआय ही कारवाई करत असताना एक आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र, सीबीआय अधिकाऱ्यांनी त्याला पकडले. दोन्ही आरोपींना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्यानंतर सीबीआयच्या टीमने मुंबईतील दोन आणि दिल्लीतील एका जागेवर सर्च ऑपरेशन सुरू केले. या कारवाई दरम्यान सीबीआयच्या टीमला जवळपास 7 लाख रुपयांची रोकड आणि काही महत्वाची कागदपत्रे आढळून आली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.