जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / सासू-सुनेचं कडाक्याचं झालं भांडण; सुनेनं रागाच्या भरात खाल्ल्या 'त्या' गोळ्या, दीड तासांच्या उपचारांनंतर...

सासू-सुनेचं कडाक्याचं झालं भांडण; सुनेनं रागाच्या भरात खाल्ल्या 'त्या' गोळ्या, दीड तासांच्या उपचारांनंतर...

सुनेने विषारी गोळ्या खाऊन भांडणांचा शेवट केला.

सुनेने विषारी गोळ्या खाऊन भांडणांचा शेवट केला.

ओरडून ओरडून घसा सुकल्यावर सासू खोलीत जाऊन बसली, तर रागाने लालबुंद झालेल्या सुनेला काय करू आणि काय नको असं झालं होतं. तिने रागाच्याभरात घरात ठेवलेल्या सल्फासच्या विषारी गोळ्या तोंडात कोंबल्या.

  • -MIN READ Local18 Gopalganj,Bihar
  • Last Updated :

गोविंद कुमार, प्रतिनिधी गोपालगंज, 10 जुलै : सासू-सुनेचं नातं हे जगातलं सर्वात बदनाम नातं मानलं जातं. अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या सासू-सुना अशा असतात की, ज्या अतिशय गुण्या-गोविंदाने राहतात, त्यांच्यात एकदाही भांडण झालेलं नसतं. तसं तर घर म्हटल्यावर भांड्याला भाडं लागतंच, मात्र या नात्यात होणारी भांडणं ही त्यापलीकडची असतात. बिहारच्या गोपालगंजमध्ये एका सुनेने विषारी गोळ्या खाऊन या भांडणांचा शेवट केला. जोरावनपूर गावातून ही धक्कादायक घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, या गावात क्यामुद्दीन मिया हे आपली आई आणि पत्नी अमीना खातून (वय - 28) यांच्यासोबत राहत होते. प्रत्येक सासू-सुनेत उडतात तसे खटके त्यांच्याही घरात उडायचे. दोघींना एकमेकींचा जाच वाटायचा. मात्र एक दिवस झालेली भांडणं सुनेच्या जीवावर बेतली. कोणत्यातरी किरकोळ कारणावरून दोघींमध्ये बाचाबाची झाली होती. ओरडून ओरडून घसा सुकल्यावर सासू खोलीत जाऊन बसली, तर रागाने लालबुंद झालेल्या सुनेला काय करू आणि काय नको असं झालं होतं. तिने रागाच्याभरात घरात ठेवलेल्या सल्फासच्या विषारी गोळ्या तोंडात कोंबल्या. काही वेळाने तिथे आलेल्या क्यामुद्दीन मियाला ती बेशुद्ध अवस्थेत दिसली. पत्नीने सल्फासच्या गोळ्या खाल्ल्याचं कळताच त्याने तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात नेलं.

News18लोकमत
News18लोकमत

भोरे रेफरल रुग्णालयातील डॉक्टरांनी अमीनावर ताबडतोब उपचार सुरू केले, मात्र तिची प्रकृती अतिशय गंभीर होती. त्यामुळे डॉक्टरांनी तिला वेळ न दवडता सदर रुग्णालयात हलवण्यास सांगितलं. सदर रुग्णालयात जवळपास दीड तास अमीनावर उपचार करण्यात आले, मात्र अखेर जे व्हायला नको होतं तेच झालं. अमीनाने जीव गमावला. ‘बाईपण भारी देवा’ची गाडी दहाव्या दिवशीही सुसाट! दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाची छप्परतोड कमाई तिच्या मृत्यूमुळे भेदरलेल्या सासरच्या मंडळींना प्रकरणात पोलिसांचा हस्तक्षेप होण्यापूर्वीच तिचा मृतदेह घरी नेला. दरम्यान, डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. सल्फासच्या गोळ्या खाल्ल्याने महिलेचा मृत्यू झाला, असं चाचण्यांमधून आढळल्याचं त्यांनी सांगितलं. आता याआधारे पोलिसांनी या तपास केला आहे. ठोस पुरावे मिळताच दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात