Home /News /crime /

मधुचंद्राच्या रात्रीच नवविवाहित जोडप्यानं केला विष पिऊनआत्महत्येचा प्रयत्न

मधुचंद्राच्या रात्रीच नवविवाहित जोडप्यानं केला विष पिऊनआत्महत्येचा प्रयत्न

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहित (Newly Married Couple) जोडप्यानं उचललं धक्कादायक पाऊल उचललं आहे. दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

    बिहार, 23 जून: एक नवविवाहित (Newly Married Couple) जोडप्यानं आत्महत्या (Commits Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बिहारच्या (Bihar) गोपाळगंजमध्ये (Gopalganj) घडली आहे. लग्नानंतरच्या मधुचंद्राच्या रात्री दोघांनी विष पिऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेनंतर या नवविवाहित जोडप्याला अत्यवस्थ अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 28 वर्षांची शांता देवी ही जमशेदपूर येथील सोनाटे भागातील रहिवासी आहे. शांताचे मीरगंज येथील चंद्रिका सिंह यांच्यासोबत लग्न ठरलं होतं. या दोघांनी प्रेमविवाह केला होता. दोघांनी एका मंदिरात लग्न केलं. त्यानंतर नवऱ्या मुलाच्या घरी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. जेवण झाल्यानंतर नवविवाहित जोडपं झोपायला गेलं होतं. घरांच्या म्हणण्यानुसार, या दोघांनी स्वतःच्या जेवणात विष घातलं होतं. मात्र या दोघांनी असं धक्कादायक पाऊल का उचचलं, याच कारण अद्याप समजू शकलेलं नाही. हेही वाचा- माजी महिला पत्रकाराची मुलासह आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक आरोप नवविवाहित जोडपं स्वतःच्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळून आलं. घरातल्यांना हा प्रकार समजताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांवर आयसीयूमध्ये दाखल करुन त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले होते. या दोघांना घरच्यांनी साबणाचं पाणी प्यायला दिलं होतं. साबणाचं पाणी प्यायल्यानं त्यांना उलटी होईल असा अंदाज घराच्यांना आला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. मात्र साबणाचं पाणी पिऊनही त्यांची प्रकृतीत काही सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे दोघांनाही रुग्णालयात आणण्यात आलं. नवविवाहित जोडप्यावर उपचार सुरु असताना रुग्णालय प्रशासनानं या घटनेची माहिती पोलिसांना दिली. हेही वाचा- नागरिकांचा निष्काळजीपणा,  कोरोना लसीकरणासंदर्भात राज्य विभागाची धक्कादायक माहिती पोलिसांनी घटनेची माहिती मिळाली असल्याचं समजताच दोघांचे नातेवाईक नवविवाहित जोडप्याला घेऊन दुसऱ्या रुग्णालयात चांगले उपचार मिळतील असं सांगून पसार झालेत. दरम्यान पोलीसांकडून त्यांच्या कुटुंबियांचा शोध सुरु आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Bihar, Crime, Marriage, Wedding

    पुढील बातम्या