मुंबई, 23 जून: मुंबईत एका माजी महिला (Former Journalist Allegedly Jumped) पत्रकारानं आपल्या 7 वर्षाच्या मुलासह उडी घेतली आहे. चांदिवलीच्या (Chandivali) नहरे अमृत शक्ती निवासी परिसरातील टिलिपिया इमारतीच्या 12 मजल्यावरुन उडी घेत महिलेनं आपलं जीवन संपवलं आहे.
तिनं 23 मे रोजी कोविड (Covid-19) मुळे रेश्मा हिचा पती सैराट मुलुकुतला यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 44 वर्षीय रेश्मा ट्रेंचिल ही नैराश्यात (Depression) होती. सैराट हा शेतीसंबंधित वस्तूंच्या ऑनलाइन व्यापार यात मुख्य व्यवसाय अधिकारी म्हणून काम करत होता.
साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच रेश्मानं आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमध्ये रेश्मानं त्याच इमारतीत राहणाऱ्या एका कुटुंबाविरुद्ध गंभीर आरोप केलेत. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
हेही वाचा- नागरिकांचा निष्काळजीपणा, कोरोना लसीकरणासंदर्भात राज्य विभागाची धक्कादायक माहिती
रेश्मा आणि तिचा पती आपला मुलगा याच्यासह 10 एप्रिल रोजी नवीन फ्लॅटमध्ये राहायला गेले. तेव्हापासून आरोपी कुटुंबियांसोबत त्यांचे मतभेद होते. मुलाच्या आवाजाच्या होणाऱ्या त्रासासंबंधी आरोपी कुटुंबियांनी ही याआधी इमारतीच्या सोसायटीकडे तक्रार दाखल केली होती.
या घटनेनंतर विभागीय पोलीस आयुक्त महेश्वर रेड्डी आणि सहायक पोलीस आयुक्त (अंधेरी) यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पुढील कारवाईसाठी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. रेश्माच्या एका पानाच्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी कुटूंबाविरोधात FIR नोंदवला आहे. ही घटना सोमवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.