• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • राज्यात दीड लाख लोकांनी घेतला नाही लसीकरणाचा दुसरा डोस, राज्य आरोग्य विभागाची माहिती

राज्यात दीड लाख लोकांनी घेतला नाही लसीकरणाचा दुसरा डोस, राज्य आरोग्य विभागाची माहिती

COVID-19 vaccination: राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांचा निष्काळजीपणाही उघड झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 जून: राज्यात कोरोनाचा (Covid-19 ) प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता राज्यात डेल्टा प्लस (Delta and Delta plus variants) व्हेरिएंटचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हेरिएंटमुळे राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांचा निष्काळजीपणाही उघड झाला आहे. काही लोकांनी पहिला डोस घेतला. त्यानंतर वेळ निघून गेल्यानंतरही लसीचा दुसरा डोस घेतला नाही आहे. राज्यातील जवळपास 1.5 लाख नागरिकांनी कोरोनाच्या दुसऱ्या लसीचा (Second Dose) डोस घेतला नसल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे. यात 50,000 ते 60,000 नागरिक मुंबईचे आहेत. या महिन्याच्या सुरूवातीला मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation) नं जवळजवळ अशा 50 हजार नागरिकांचा शोध घेण्यासाठी मोहिम हाती घेतली. मुंबईत वेगानं लसीकरण सुरु आहे. प्रत्येक मुंबईकरांनी लस घ्यावी यासाठी प्रशासन विविध योजना ही आखत आहे. मात्र असं असतानाही 50 हजार मुंबईकरांनी लशीचा दुसरा डोस घेतला नाही आहे. पालिकेनं (BMC)आता अशा लोकाचं ट्रेसिंग (Drive To Trace) सुरु केलं आहे. पालिकेनं या लोकांचा शोध घेण्यास सुरु केलं असून प्रभाग कार्यालयांना याची चौकशी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हेही वाचा-  Watch Video: भुक्कड हत्ती, खाण्यासाठी भिंत तोडणारा हत्ती कधी पाहिलात का? आरोग्य आणि सेवा संचालनालयाच्या सहसंचालक डॉ. अर्चना पाटील यांनी या आकड्यावर शिक्कामोर्तब केला आहे. अर्चना पाटील यांनी सांगितलं की, राज्यातील एक लाखाहून अधिक लोकांनी दुसरा डोस घेतला नाही आहे. यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसीचा समावेश आहे. दरम्यान नागरिकांनी नोंदणीच्या वेळी दिलेल्या माहितीद्वारे त्यांचा शोध घेण्यास विभागानं सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील म्हणाले की, राज्यभरातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना ज्या नागरिकांनी लसीकरणातील दुसरा डोस घेतला नाही आहे अशा नागरिकांचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  Published by:Pooja Vichare
  First published: