मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /भीम आर्मीच्या जिल्हाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, हात-पाय मोडेपर्यंत मारहाण, काय आहे प्रकरण?

भीम आर्मीच्या जिल्हाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, हात-पाय मोडेपर्यंत मारहाण, काय आहे प्रकरण?

जैसलमेरचे पोलीस अधीक्षक भंवर नथावत यांच्या कार्यशैलीविरोधात मोर्चा काढणारे भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष हरीश इंखिया यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला

जैसलमेरचे पोलीस अधीक्षक भंवर नथावत यांच्या कार्यशैलीविरोधात मोर्चा काढणारे भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष हरीश इंखिया यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला

जैसलमेरचे पोलीस अधीक्षक भंवर नथावत यांच्या कार्यशैलीविरोधात मोर्चा काढणारे भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष हरीश इंखिया यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला

  • Local18
  • Last Updated :
  • Jaipur, India

श्रीकांत व्यास, प्रतिनिधी

जैसलमेर, 21 मार्च : राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस अधिक्षकांच्या विरोधात मोर्चा काढणारे भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष हरीश इंखीया यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. भीम आर्मीचे अध्यक्ष हरिश इंखीया यांनी पोलीस अधिक्षकांवर आरोप करत त्यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते.  यानंतर हरिश यांच्यावर जिवघेणा हल्ला झाल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान हरिश यांच्यावर हल्ला झाल्याने जैसलमेरमध्ये तणावपूर्ण शांतता होती. या हल्ल्यात हरीश यांचे हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या दोन दिवसांपूर्वी रविवारी 5 ते 7 तरुणांनी गांधी कॉलनीत हरीश इंखीया यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांना जखमी केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यावेली जखमी हरीश यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

(पुलाखालून येत होती दुर्गंधी, एक पोतं सापडलं आणि सगळेच हादरले)

दरम्यान हल्ला केलेल्या तरुणाने घटनेची जबाबदारी स्वीकारून धमकीही दिली. गेनाराम भेळ उर्फ ​​गेन्सा असे जबाबदारी स्वीकारलेल्या तरुणाचे नाव असून तो कट्टर गुन्हेगार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान रविवारी रात्री उशिरा याप्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले.

मागच्या काही काळापासून एससी-एसटी समाजावर अन्याय होत आहे. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची दखल पोलीस प्रशासन घेत नसल्याने आम्ही पोलीस अधिक्षकांच्या विरोधात आंदोलन केले होते. यानंतर लगेच पुढच्या दोन दिवसांत अवैध कॅसिनो  आणि अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या टोळीतील काही जणांनी माझ्यावर खोटे आरोप करत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले, हरीश इंखिया म्हणाले.

निवेदन देणाऱ्या लोकांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या काही आरोपींचाही समावेश असून तेच लोक एसपींना निवेदन देत असल्याचा आरोप हरीश यांनी केला आहे. कुठेतरी माझ्या मनात अशीही शंका आहे की पोलीस अधीक्षकांचा मी पुतळा जाळायला नको होता. परंतु माझ्यावर हल्ला झाला आहे यामध्ये एसपींचाही हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 4 बाईकवरून आलेल्या 8 लोकांनी मला मारहाण केली, त्यापैकी मी 4 लोकांना ओळखले आहे.

(गुजरातमधल्या हत्येचा बदला नवी मुंबईत, 25 वर्षांपूर्वीची खून्नस खून करून काढली)

दुसरीकडे, जैसलमेरचे पोलिस अधीक्षक भंवर सिंह नाथवत यांनी हा आरोप निराधार असल्याचे सांगत आमच्यासाठी सर्व समान आहेत आणि कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही, असे सांगितले. कारण गुन्हा करणारी व्यक्ती गुन्हेगार आहे आणि त्याच्याबद्दल कोणतीही सहानुभूती दाखवली जात नाही. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. रविवारी सायंकाळी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक आरोपींचा शोध घेत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Local18, Rajsthan