संतोष कुमार गुप्ता (छपरा), 21 मार्च : बिहारमधील छपरा जिल्ह्यात खळबळजनक माहिती समोर आली आहे. नेहमी रहदारी असलेल्या पुलाखाली दोन तरुणांचे मृतदेह सापडले आहेत. ही घटना सोनपूर पोलीस स्टेशन परिसरात घडल्याचे बोलले जात आहे. NH-19 ते गुलरिया घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यात असलेल्या पुलाखाली पोत्यात गुंडाळून दोन मुलांचे मृतदेह पडल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान पुलाजवळ दुर्गंध पसरल्याने शंका व्यक्त करण्यात आली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून माहिती घेत पोत्यात गुंडाळून टाकलेले मृतदेह असल्याचे आढळले आहेत. याबाबत सोनपूर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला, मात्र मृतदेह पूर्णपणे कुजल्याने हे कोणाचे मृतदेह आहेत याची ओळख पटू शकली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुणांची गळा चिरून हत्या केल्यानंतर, पुरावा लपवण्याच्या उद्देशाने त्यांना पोत्यात फेकून दिले होते. याबाबत पोलिसांनी या तरूणांची माहिती घेण्यासाठी परिसरातून बेपत्ता तरुणांची माहिती घेत आहेत. मृत तरुणांपैकी एकाच्या अंगावर निळ्या रंगाची पॅन्ट आणि पांढरा शर्ट आहे, तर दुसऱ्या मृतदेहाजवळ लाल पांढरी बेडशीट आढळून आली आहे.
या घटनेनंतर दोन्ही तरुणांची इतरत्र हत्या करून त्यांचे डोके व धड वेगळे करून अनेक तुकडे करून प्लास्टिकच्या पिशवीत भरून पुलाखाली फेकून दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन्ही मृतदेह कुजलेले असल्याने ही घटना 5 दिवसांपूर्वी घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान मृतदेहाजवळ गरुड आणि कावळे घिरट्या घालत असताना स्थानिकांनी याबाबत पाहणी केली असता ही बाब उघडकीस आली.
या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एसपी गौरव मंगला यांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Crime, Crime news, Local18