प्रमोद पाटील, प्रतिनिधी
नवी मुंबई, 20 मार्च : चार दिवसांपूर्वी नवी मुंबईच्या नेरुळमध्ये बांधकाम व्यावसायिकाची भर दिवसा दोन जणांनी गोळी झाडून हत्या केली होती. याप्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 25 वर्षांपूर्वी गुजरातमध्ये केलेल्या खून आणि मारहाणीचा बदला नवी मुंबईमध्ये घेण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला असून चार जणांना ताब्या घेण्यात आलं आहे.
नवी मुंबई हत्या प्रकरणाती मुख्य आरोपी गुजरातच्या कच्छमधला असून गोळीबार करणारे तीन आरोपी बिहारमधून ताब्यात घेण्यात आले आहेत.
25 वर्षापूर्वी मयत व्यक्तीने गुजरातमध्ये एका व्यक्तीचा खून केला होता, तसंच त्यांचा नातेवाईकांना भर चौकात मारहाण केली होती. त्याचाच राग मनात धरून मयत व्यक्तीचा काटा काढण्यासाठी बिहार मधील सराईत गुन्हेगारांना 25 लाखाची सुपारी देण्यात आली. त्याप्रमाणे आरोपींनी मयत व्यक्तीची रेकी केली आणि त्याला नेरूळमध्ये रस्त्यात अडवून गोळ्या झाडून ठार केले.
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू करून त्यातील चार आरोपी ताब्यात घेतले आहेत. यातला एकजण पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांची टीम बिहार मधून उरलेले आरोपी घेऊन येत आहे. तर अजून काही आरोपी यात सामील आसल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांचा तपास अजूनही सुरू असून यातील सामील आरोपी लवकरच जेरबंद होतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
15 मार्चला नवी मुंबईच्या नेरुळमध्ये दोन जणांनी मोटरसायकलवर येऊन कारमधून जाणाऱ्या व्यक्तीवर गोळीबार केला. गोळीबारात हल्ला झालेली व्यक्ती जागीच ठार झाली. गोळीबारामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव सावजी भाय पटेल असं आहे. पटेल हे बांधकाम व्यावसायिक होते. संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास पटेल यांच्यावर गोळीबार झाला होता, त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.