जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / कार धडकल्यावर बस चालकाला मारहाण, बेस्ट बसचीही केली तोडफोड

कार धडकल्यावर बस चालकाला मारहाण, बेस्ट बसचीही केली तोडफोड

कार धडकल्यावर बस चालकाला मारहाण, बेस्ट बसचीही केली तोडफोड

काल बसचालक रमेश गणपत पवार (वय 55 वर्षे) आणि त्यांचे सहकारी भरत मुंबरकर (वाहक) हे दोन्ही जण बेस्ट बस क्र. MH 01 L A 6432 घेऊन दिंडोशी बस डेपो येथुन काशीगावच्या दिशेने जात होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई, 15 नोव्हेंबर : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेस्ट बस चालकांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तसेच तीन अज्ञात व्यक्तींकडून बेस्ट बसचे तोडफोडही करण्यात आली आहे. यानंतर बेस्ट बस चालकांना मारहाण करणाऱ्या व बेस्ट बसची तोडफोड करणाऱ्या व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या परप्रांतीयांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल बसचालक रमेश गणपत पवार (वय 55 वर्षे) आणि त्यांचे सहकारी भरत मुंबरकर (वाहक) हे दोन्ही जण बेस्ट बस क्र. MH 01 L A 6432 हाय बस घेऊन दिंडोशी बस डेपो येथुन काशीगावच्या दिशेने जात होते. याचदरम्यान, सुमारे रात्री 09.45 बस पायल जंक्शन, पश्चिम दुदगती मार्ग, दहिसर चेकनाकज्वल, दहिसर पूर्व, इथून मुंबई इथे आली. यावेळी वॅगनआर कार क्र. MH 04 GM 9937 हाय बसला ड्रायव्हरच्या बाजुला येवून धडकली. त्यावेळी या वॅगनआर कारमधील तीन अज्ञातांनी कारमधुन उतरुन बसमध्ये चढून बसचालक यांना जोरदार मारहाण केली. आरोपीनी केलेल्या दगडफेकी दरम्यान महिला परप्रांतीयांच्या बोटास जखम झाली. दरम्यान, या घटनेदरम्यान, घटनास्थळी दहिसर पोलीस दाखल झाले. यानंतर पोलिसांनी या सर्व प्रकरणात 2 आरोपींना ताब्यात घेतले. नंतर जखमींना जवळच्या शताब्दी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हेही वाचा -  मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, बोरिवलीतून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक या आरोपींविरोधात मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा व इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संजीव गौरीशंकर सिंग (वय 47 वर्षे) आणि समीर दत्ताराम सुर्वे (वय 45) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना 17 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात