जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / क्रिकेटच्या मैदानात रक्तरंजीत थरार! क्लीन बोल्ड केलं म्हणून बॉलरला आयुष्यातूनच केलं OUT

क्रिकेटच्या मैदानात रक्तरंजीत थरार! क्लीन बोल्ड केलं म्हणून बॉलरला आयुष्यातूनच केलं OUT

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

वाद चिघळला आणि बॅट्समनने थेट बॉलराच आयुष्यातून आऊट केलं. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Kanpur Nagar,Uttar Pradesh
  • Last Updated :

कानपूर : क्रिकेटच्या मैदनात छोट्या गोष्टींवरुन वाद होतात हे तर चाहते पाहतात. मात्र क्रिकेटच्या मैदानातला वाद इतका टोकाला गेला की थेट आयुष्य संपवण्यावर गोष्ट आली. क्रिकेटच्या मैदानात बॉलरने क्लीन बोल्ड केलं आणि वादचं कारण झालं. वाद चिघळला आणि बॅट्समनने थेट बॉलराच आयुष्यातून आऊट केलं. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. खेळताना बॉलरची हत्या झाली आहे. मैदानात आपापसात क्रिकेट खेळत होती. यादरम्यान बॉलरने बॅट्समनला क्लीन बोल्ड केलं. यामुळे बॅट्समनचा संतप्त झाला की त्याने बॉलरची गळा दाबून मैदानात हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Pune News: राहुलच्या शेवटच्या फोनने वाढवला सस्पेन्स, दर्शना पवारच्या मर्डर मिस्ट्रीमध्ये नवा ट्विस्ट

घटमपूर परिसरातील रेवन्ना भागात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गावात काही मुले क्रिकेट खेळत होती. हरगोविंद नावाचा मुलगा बॅटिंग करत होता आणि सचिन बॉलिंग करत होता. सचिनने आपल्या वेगवान बॉलिंगने हरगोविंदला आऊट केलं. यामुळे तो चिडला आणि भांडू लागला.

Crime News : उडाल्या रक्ताच्या चिळकांडया; मुंबईत धावत्या रिक्षात गर्लफ्रेंडचा चिरला गळा

यादरम्यान हरगोविंदचा भाऊही घटनास्थळी पोहोचला आणि दोघांनी मिळून सचिनचा गळा आवळून त्याची हत्या केली. हत्येची माहिती मिळताच सचिनच्या कुटुंबीयांनी धावत येऊन त्याला उचलून घाटमपूर रुग्णालयात नेले. जिथे तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात