मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

VIDEO : बारामतीत भर दिवसा भयानक घटना, शाळेत मुलीला घ्यायला गेलेल्या वडिलांवर तरुणांचा निर्घृण हल्ला, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

VIDEO : बारामतीत भर दिवसा भयानक घटना, शाळेत मुलीला घ्यायला गेलेल्या वडिलांवर तरुणांचा निर्घृण हल्ला, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

बारामतीत भर दिवसा हत्येचा थरार, पालकावर तरुणांचा हल्ला, CCTVत घटना कैद

बारामतीत भर दिवसा हत्येचा थरार, पालकावर तरुणांचा हल्ला, CCTVत घटना कैद

बारामती शहरातील कविवर्य मोरोपंत हायस्कूलमध्ये मुलीला न्यायला आलेल्या वडिलांवर खुनी हल्ला झाला.

पुणे, 18 ऑगस्ट : बारामतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत आपल्या मुलीला घेण्यासाठी गेलेल्या वडिलावर काही अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या अल्पवयीन मुलांनी अतिशय निर्घृणपणे संबंधित व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्याची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. खरंतर संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली नाही. पण काहीशी घटना या सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाली आहे. या सीसीटीव्हीत हल्लेखोर मुलांच्या हातात धारदार शस्त्र दिसत आहेत. तसेच ते अतिशय निर्घृणपणे हल्ला करत असल्याचं देखील स्पष्टपणे दिसत आहे. संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगाला काटा येईल, इतकी भयानक दृश्य आहेत. बारामती शहरातील कविवर्य मोरोपंत हायस्कूलमध्ये मुलीला न्यायला आलेल्या वडिलांवर खुनी हल्ला झाला. आरोपींनी मुलीच्या वडिलांवर धारदार शस्त्रांनी केले वार. हल्ला करणारे मुले हे अल्पवयीन आहेत. या हल्ल्यामध्ये वडील शशिकांत कारंडे यांचा जागीच मृत्यू. श्रीराम नगर कवी मोरोपंत हायस्कूल समोर संबंधित घटना घडली. संबंधित घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बारामती शहरातील त्रिमूर्ती नगर येथे राहणारे 54 वर्षीय शशिकांत कारंडे हे आज सायंकाळी सव्वा पाच ते साडेपाचच्या दरम्यान शहरातील कविवर्य मोरोपंत हायस्कूल येथे मुलीला आणावयास गेले असताना बाहेर थांबलेल्या तीन युवकांनी धारदार शस्त्रांनी डोक्यात, मानेवर वार केल्याने ते जागेवरच कोसळले. शशिकांत कारंडे यांना हॉस्पिटलमध्ये नेले असताना डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. यापूर्वी देखील याच मुलांनी शशिकांत कारंडे यांच्या मुलावर वार केले होते. त्यानंतर आज शाळेसमोरच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलं हल्ला करुन फरार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शशिकांत यांना रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जातोय.
First published:

Tags: Cctv, Cctv footage, Crime

पुढील बातम्या