मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नर्सच्या हातातून पडून नवजात मुलाचा मृत्यू; कुटुंबीयांना बाळ मृत जन्मल्याचं सांगितलं, अखेर अशी झाली पोलखोल

नर्सच्या हातातून पडून नवजात मुलाचा मृत्यू; कुटुंबीयांना बाळ मृत जन्मल्याचं सांगितलं, अखेर अशी झाली पोलखोल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पुनमने पतीला सांगितलं की, बाळ सुदृढ, निरोगी आणि सुरक्षित जन्माला आलं होतं. मात्र तिथल्या नर्सने त्याला एका हातानं धरलं होतं, निष्काळजीपणामुळे बाळ तिच्या हातातून खाली पडलं आणि त्याचा मृत्यू झाला.

    नवी दिल्ली 27 एप्रिल : नर्सच्या (Nurse) निष्काळजीपणामुळे एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतापजनक बाब म्हणजे हे प्रकरण लपवण्यासाठी रुग्णालय (Hospital) प्रशासनाने खोटी कहाणी रचली आणि ती पीडित कुटुंबाला सांगितली. परंतु, मृत बाळाच्या आईने नर्सच्या हातातून बाळ पडल्याचं सांगितलं आणि या प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकरणी पीडित कुटुंबाने रुग्णालय प्रशासनाविरोधात तक्रार दिली असून पोलीस तपास सुरू आहे.

    महाराष्ट्र हादरला! जन्मदात्याचा लेकीवर वारंवार बलात्कार; मग नरबळीसाठी तिच्या गळ्यात घातला हार, पण...

    झालं असं की, उत्तर प्रदेशमधील चिनहटमधील जुग्गौर येथील रहिवासी असलेल्या जीवन राजपूत यांनी 19 एप्रिल रोजी त्यांची गर्भवती पत्नी पूनम राजपूत हिला प्रसूती वेदना झाल्यानंतर मल्हौर येथील सेंटर फॉर न्यू हेल्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. येथे रात्री 10 ते 11 च्यादरम्यान पूनमने मुलाला जन्म दिला. मात्र जन्मानंतर नवजात बाळ मरण पावलं. लेबर रूममध्ये (Labor Room) पुनमने आरडाओरडा सुरू केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. बाहेर उभ्या असलेल्या पतीसह अन्य नातेवाईकांनी खोलीत जाण्याचा प्रयत्न केला असता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवलं आणि त्यांच्यात बाचाबाची झाली.

    शेवटी कुटुंबीयांनी रुममध्ये प्रवेश केला. तेव्हा पुनमने पतीला सांगितलं की, बाळ सुदृढ, निरोगी आणि सुरक्षित जन्माला आलं होतं. मात्र तिथल्या नर्सने त्याला एका हातानं धरलं होतं, निष्काळजीपणामुळे बाळ तिच्या हातातून खाली पडलं आणि त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, नर्सच्या चुकीमुळे मुलाचा मृत्यू झाला, ही बाब लपवण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी खोटी कथा रचून बालकाचा आधीच मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र, बाळाच्या आईने लेबर रुममध्ये काय घडलं, याची माहिती कुटुंबीयांना दिली, त्यातून नर्सची चूक असल्याचं लक्षात आलं. या संदर्भात वन इंडियाने वृत्त दिलंय.

    17 वर्षांपासून फरार होत्या 8 महिला गुन्हेगार; प्लास्टिक सर्जरी करून चेहरा आणि नावही बदललं, पण अखेर...

    याप्रकरणी कुटुंबीयांनी चिनहट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नवजात बालकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पीएम रिपोर्टमध्ये, मुलाचा पडल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलंय. शिवाय त्याच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. या रिपोर्टच्या आणि कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कलम 304 ए अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असं चिनहट पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.

    दरम्यान, नर्सच्या एका चुकीमुळे निरोगी जन्मलेल्या बाळाचा मृत्यू झाला आहे. नर्सच्या या बेजबाबदारपणामुळे मूल गमवावं लागल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या या घटनेची पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे.

    First published:
    top videos

      Tags: Baby died, Crime news