जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / महाराष्ट्र हादरला! जन्मदात्याचा लेकीवर वारंवार बलात्कार; मग नरबळीसाठी तिच्या गळ्यात घातला हार, पण...

महाराष्ट्र हादरला! जन्मदात्याचा लेकीवर वारंवार बलात्कार; मग नरबळीसाठी तिच्या गळ्यात घातला हार, पण...

महाराष्ट्र हादरला! जन्मदात्याचा लेकीवर वारंवार बलात्कार; मग नरबळीसाठी तिच्या गळ्यात घातला हार, पण...

स्वत:च्या मुलीशी शारिरीक संबंध ठेवणाऱ्या नराधम बापाने गुप्तधनासाठी (Secret Money) लेकीचा नरबळी देण्याचा पयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

यवतमाळ, 27 एप्रिल : स्वत:च्या मुलीशी शारिरीक संबंध ठेवणाऱ्या नराधम बापाने गुप्तधनासाठी (Secret Money) लेकीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली आहे. 18 वर्षांच्या मुलीसोबत ही घटना यवतमाळच्या मादनी गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिला आणि मांत्रिकासह 11 आरोपींविरोधात बाभूळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नेमकी काय घटना? पीडिता 13 वर्षांची असताना शाळेला सुट्ट्या लागल्यावर यवतमाळमधून घरी येत होती. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला वाईट उद्देशाने कुठेही हात लावायचे. ती वडिलांना कृत्याबद्दल आईला सांगत होती. मात्र, तेव्हा वडील लाड करत असतील असे तिची आई तिला सांगायची. मात्र, त्यांचे अंगाला हात लावणे सुरुच होते. त्यानंतर ती मुलगी एकदा सुट्टीवरुन घरी आल्यानंतर तिच्या  वडिलांनी ती झोपेत असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिला त्रास होत असल्याने तिने आईला सांगितलं. मात्र, तेव्हा तिला वाटलं की मासिक पाळी येत असेल म्हणून दुखत असेल, त्यामुळे तिने दुर्लक्ष केलं. वडील तिच्या आईला खूप मारहाण करतात. त्यामुळे ती त्यांना घाबरते. पुढे मी जेव्हा जेव्हा घरी यायचे तेव्हा वडील माझ्यासोबत  जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवत होते. त्यांना विरोध केला असता आईसह मला मारुन टाकण्याची धमकी देण्यात आली, असे पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले. 24 एप्रिलला पीडित मुलीच्या वडिलांनी तिला आणि बहिणीला बेदम मारहाण केली. तुझ्यासारखी मुलगी जिवंत ठेवून काही उपयोग नाही, असे सांगितले. त्यानंतर 25 एप्रिल रोजी कुणाशी तरी फोनवर गुप्तधनाबाबत बोलणं झालं आणि संध्याकाळी 7 वाजता तिला अंघोळ करुन तयार होण्यास सांगितले. त्यांनंतर त्यांची खोली साफ केली. रात्री 9 वाजताच्या सुमारास एक शेजारी, शेतात काम करणारा व्यक्ती आणि अजून 4 पुरुष आणि दोन महिला त्याठिकाणी आल्या. हेही वाचा -  पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पिंपरी चिंचवडमधील संतापजनक घटना   ते सर्वजण आणि पीडित मुलीचे वडील घराच्या मागच्या खोलीत गेले. तेव्हा पीडिता आणि तिची बहीण बाजूच्या रुममध्ये थांबून होते. त्यांना दरवाजा लावायला सांगितला आणि बाहेर जायचं नाही, असं सांगितले. त्यानंतर त्यांची चर्चा सुरु असताना एकजण म्हणाला की गुप्तधनासाठी एकाचा बळी गरजेचा आहे. तेव्हा तिचे वडील म्हणाले की, मी माझ्या मोठ्या मुलीचा बळी देण्यास तयार आहे. ते वारंवार वाल्मिक बाबा अशा नावाने मांत्रिकाला हाका मारत होते. त्यांच्या बोलण्यातून ते सर्वजण राळेगावातून आल्याचं पीडितेला कळाले. पीडितेच्या वडिलांनी तिघींच्या हाती एक एक लिंबू दिला आणि पुन्हा त्या खोलीत परत गेले. तेव्हा पीडिता लपून बघत होती. दोन महिलांच्या हाताने जागेची पूजा करुन बाकी जण एक मोठा खड्डा खोदू लागले. तेव्हा पीडितेने तिच्या मोबाईलमध्ये खड्ड्याचा फोटो काढला आणि यवतमाळच्या मित्राला पाठवला. तसंच माझा बळी जाण्याची शक्यता आहे, मला वाचव, असा मेसेज त्याला केला. हा मेसेज वडिलांनी वाचू नये म्हणून तो डिलीटही केला. त्यानंतर तिच्या वडिलांनी जबरदस्तीने मला तिला खोलीत नेले. तिथे सर्वांनी तिची पूजा केली. तिच्या गळ्यात हार घालण्यात आला. तेवढ्यात पोलीस दाखल झाल्यामुळे तिचा जीव वाचला, असं पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात